Shivrajyabhishek Din 2024 : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम

Shivrajyabhishek Din 2024 : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त गुरुवारी कोल्हापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. नवीन राजवाड्याच्या प्रांगणातील दिमाखदार कार्यक्रम, अ. भा. मराठा महासंघाची भव्य मिरवणूक आणि शिवाजी पेठेतील विविध कार्यक्रम यांनी हा सोहळा परिपूर्ण असणार आहे.

नवीन राजवाड्याच्या प्रांगणात दिमाखदार सोहळा

नवीन राजवाड्याच्या प्रांगणात मंगळवारी सकाळी ७ ते ८ या वेळेत सनई-चौघडा, साडेआठ वाजता मराठा लाईट इन्फंट्रीच्या वाद्यवृंदाचे सादरीकरण, ९ वाजून ५ मिनिटांनी शककर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्ण मूर्तीवर अभिषेक करण्यात येणार आहे साडेनऊ वाजता शिवशाहिरांचा पोवाडा आणि मराठा स्फूर्तिगीताचे सादरीकरण होईल. यावेळी खासदार शाहू महाराज, सौ. याज्ञसेनी महाराणीसाहेब, माजी आ. मालोजीराजे, सौ. मधुरिमाराजे, यशस्विनिराजे व यशराजराजे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मराठा महासंघातर्फे मिरवणूक

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे मंगळवार पेठेतील मराठा महासंघाच्या कार्यालयापासून दुपारी साडेचार वाजता मिरवणुकीस प्रारंभ होईल. मिरवणुकीत ३५० बालशिवाजी, जिजाऊ माँसाहेब व मावळे त्यांच्या वेशभूषेत मुले, महिला सहभागी होणार आहेत. १,००० वारकरी सहभागी होणार आहेत. शिवकालीन युद्धकला आखाड्यातर्फे मिरजकर तिकटी येथे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करण्यात येईल. मराठा महासंघ महिला आघाडीचे लेझीम पथक, याशिवाय झांज पथक, धनगरी ढोल, प्रबोधनात्मक फलक यांची विविधता असणार आहे.

शिवाजी पेठेतही भव्य सोहळा

शिवाजी पेठेतील निवृत्ती चौक तरुण मंडळ व रिक्षाचालक सेनेच्या वतीने आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याची सांगता गुरुवारी (दि. ६) ३५० व्या राज्याभिषेक दिन सोहळ्याने होणार आहे. सकाळी साडेसात वाजता शिवछत्रपतींच्या पुतळ्यास अभिषेक, सकाळी १० वाजता प्रसादवाटप, सायंकाळी ७ वाजता बक्षीस समारंभ व रसिक रंजन मराठी गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता आतषबाजीने कार्यक्रमाची सांगता होईल. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक संजय जाधव व संजय शेळके यांनी केले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news