शिवाजीराव चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने पृथ्वीराज पाटीलला २ लाखांचे बक्षीस : शंभूराज देसाई
सातारा : पुढारी वृत्तसेवा : साताऱ्यात शनिवारी पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज पाटील यांना काही कारणामुळे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळण्यास विलंब झाला. याबाबत मी तत्काळ दखल घेऊन कै. शिवाजीराव चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने २ लाखांचा धनादेश आजच (दि. १०) पृथ्वीराज पाटील यांच्या मूळगावी पाठवला आहे, अशी माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
सातारा- जावलीचे आमदार व अजिंक्य उद्योगसमुहाचे प्रमुख शिवेंद्रराजे भोसले यांनी तातडीने पृथ्वीराजला सातारा-जावलीकरांच्यावतीने ५ लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर केली आहे. तर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील झाल्यानंतर त्याला बक्षीसापोटी काहीच न रक्कम मिळाल्याने सोशल मीडियात चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज पाटीलला भाजपकडून ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
- 'महाराष्ट्र केसरी' पृथ्वीराज पाटीलला भाजपकडून ५ लाखांचे बक्षीस; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
दरम्यान, पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या प्रकाश बनकरला अस्मान दाखवत मानाची गदा मिळवली. मात्र, या झालेल्या स्पर्धेनंतर बक्षीसच न मिळाल्याची खंत पृथ्वीराज पाटील यानं बोलून दाखवली होती. यावर त्याचे चुलते संग्राम पाटील आणि जागतिक कुस्ती स्पर्धेतील विजेते सोनबा गोंगाने यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचलंत का ?
पाहा व्हिडीओ :

