Private bus accident : अंबप फाटा येथे खासगी आराम बस उलटली, सुदैवाने जीवितहानी नाही

बेंगलुरूहून मुंबईला चाललेल्‍या आराम बसला अपघात, यामध्ये २५ प्रवासी होते.
Private bus accident
Private bus accident : अंबप फाटा येथे खासगी आराम बस उलटली, सुदैवाने जीवितहानी नाहीFile Photo
Published on
Updated on

Private bus overturns at Ambap Phata, fortunately no casualties

कासारवाडी : पुढारी वृत्तसेवा

पुणे-बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर अंबप फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बेंगलुरू होऊन मुंबईला चाललेली खासगी आराम बस उलटली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. चालक व प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना आज (सोमवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

Private bus accident
Kolhapur Rain Update | कोल्‍हापुरात धुवाँधार पाऊस, ९ बंधारे पाण्याखाली, रात्रभर पावसाचा जोर

या विषयी घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, रेश्मा टूर्स यांची आराम बस सोमवारी पहाटे बेंगलुरूहून मुंबईला जाण्यासाठी निघाली होती. यामध्ये सुमारे २५ प्रवासी होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुणे-बेंगलुरु महामार्गावर हातकणंगले तालुक्यातील अंबप फाटा येथे बस आली.

Private bus accident
कोल्हापूर, सांगली पूर नियंत्रण; 963 कोटींच्या कामांना मंजुरी

अंबप फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्याकडे वाहतूक वळवली आहे. वळवलेली वाहतूक चालकाच्या निदर्शनास आली नसल्याने त्याने सरळ बस घेतली. पुढे सिमेंटचे ब्रॅकेट्स लावल्याने त्यांना धडकून बस डाव्या बाजूला उलटली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. चालकासह यातील प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना दोन रुग्णवाहिकेतून एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news