Kolhapur Sound System Case | गणेश आगमन मिरवणुकीत प्रेशर मिडचा वापर; चौघांवर मुरगूड पोलिसांत गुन्हा

नानीबाई चिखलीतील नृसिंह तरुण मंडळावर मुरगूड पोलिसांची कारवाई; २० लाखांचे साऊंड सिस्टीम, ट्रॅक्टर-ट्रॉली साहित्य जप्त
Murgud Illegal Sound System Case
पोलिसांनी कारवाई करत सुमारे २० लाख रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम, ट्रॅक्टर व ट्रॉलीसह साहित्य जप्त केले Pudhari
Published on: 
Updated on: 

Murgud Illegal Sound System Case

मुरगूड : गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान साऊंड सिस्टीममध्ये प्रेशर मिडचा वापर केल्याप्रकरणी नानीबाई चिखली (ता. कागल) येथील नृसिंह तरुण मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह ट्रॅक्टर मालक आणि साऊंड सिस्टीम मालक अशा चौघांविरुद्ध मुरगूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कारवाई करत सुमारे २० लाख रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम, ट्रॅक्टर व ट्रॉलीसह साहित्य जप्त केले.

नानीबाई चिखली येथे सोमवारी सायंकाळी नृसिंह तरुण मंडळाच्या वतीने गणेशमूर्ती आगमन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत डॉल्बी साऊंड सिस्टीममध्ये प्रेशर मिडचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून मानवी आरोग्य व सुरक्षिततेला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने साऊंड सिस्टीमचा वापर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

Murgud Illegal Sound System Case
Kolhapur | गणपती मिरवणुकीत ध्वनीप्रदूषण; शिरोली, मौजे वडगावमधील दोन मंडळाचे 20 जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी गंगाराम भाऊसो खोंद्रे, विजय आण्णासो गोनुगडे, नंदकुमार दत्तात्रय घाटगे आणि रोहित महादेव पोवार (सर्व रा. चिखली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी कारवाईदरम्यान महिंद्रा अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर, डंपिंग ट्रॉली तसेच व्ही.एम. कंपनीचे दोन बेस व दोन टॉप, प्रेशर मिड असलेले साऊंड सिस्टीमचे बॉक्स आणि चार अ‍ॅम्प्लिफायर असा सुमारे २० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Murgud Illegal Sound System Case
Kolhapur|शिरोली परिसरातील गुन्हेगारीवर कठोर कारवाई, विविध टोळ्यांतील तब्बल २५ जण हद्दपार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे डीजे व साऊंड सिस्टीमचा वापर करणाऱ्या गणेश मंडळांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news