kolhapur | कष्टातून सरकारी नोकरी मिळविली, सुखाच्या क्षणी नजर लागली; आकस्मित निधनाने कुटुंबासह सासरचा आधार हरपला

kolhapur | कष्टातून सरकारी नोकरी मिळविली, सुखाच्या क्षणी नजर लागली; आकस्मित निधनाने कुटुंबासह सासरचा आधार हरपला
kolhapur | कष्टातून सरकारी नोकरी मिळविली, सुखाच्या क्षणी नजर लागली; आकस्मित निधनाने कुटुंबासह सासरचा आधार हरपला
Published on
Updated on

कोल्हापूर : घरची परिस्थिती हलाखीची, प्रचंड कष्टातून शिक्षण घेत त्यांनी सरकारी नोकरी मिळविली. पत्नी, दोन मुली, मुलगा असं त्यांच आनंदी कुटुंब, पण गुरुवार (दि.9) या हसत्या-खेळत्या कुटुंबासाठी घातवार ठरला. हलाखीतून उभारलेल्या कांबळे यांच्या आयुष्यास नजर लागली. कुटुंबाचा आधार असणारे प्रदीप खंडेराव कांबळे यांचा अपघाती मृत्यू झाला अन् कांबळे कुटुंब उघड्यावर आले. प्रदीप यांच्या अपघाती मृत्यूमुळे कांबळे कुटुंबासह प्रदीप यांच्या सासरचाही आधार हरपला आहे.

प्रदीप हे भूमी अभिलेख विभागात परीक्षण भूमापक म्हणून कार्यरत होते. ते त्यांच्या कुटुंबासह रमणमळा येथील सुभेदार राणोजी आंबेडकर हौसिंग सोसायटीमध्ये वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी त्यांची शिराळा भूमी अभिलेख कार्यालयात बदली झाली होती. गुरुवारी प्रदीप हे कामानिमित्त शिराळ येथून इश्वरपूर येथे निघाले होते. यावेळी रेठरे येथील वळणावर भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत प्रदीप यांचा मृत्यू झाला अन् कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

मुलं बापाच्या मायेला पोरकी

प्रदीप यांना दोन मुली व एक मुलगा आहे. एक मुलगी इयत्ता नववीमध्ये, दुसरी मुलगी चौथीच्या वर्गात तर मुलगा इयत्ता 1 लीमध्ये शिकत आहेत. ही चिमुकली प्रदीप यांच्या अपघाती मृत्यूमुळे बापाच्या मायेला पोरकी झाली आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

सासरचाही आधार हरपला

प्रदीप यांच्या सासर्‍यांचे अलीकडच्या काळातच निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या सासरलाही प्रदीप यांचाच आधार होता. पण प्रदीप यांच्या आकस्मित निधनाने सासरचाही आधार हरपला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news