नको सिमेंटचा पूल, साधा साकव तरी बांधा; शाळेसाठी चिमुकल्यांची प्रशासनाला साद

शिक्षणासाठी पावडाईवाडीतील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
Kolhapur News
शाळेसाठी पावडाईवाडीतील विद्यार्थ्यांना याच ओढ्यातून जावे लागते. file photo
Published on
Updated on

विशाळगड : पावडाईवाडी येथील मुलांना शिक्षणासाठी ओढयाच्या पाण्यातून जीवघेणी कसरत करावी लागत आहे. 'नको आम्हाला पक्का रस्ता आमचा निसरडा रस्ता बरा, आम्हाला नको सिमेंटचा पूल पण साधा लाकडी किंवा लोखंडी साकव तरी बांधा,' अशी साद येथील चिमुकले विद्यार्थी प्रशासनाला घालत आहेत. एखादा लाकडी साकव अथवा लोखंडी साकव उभारून शैक्षणिक नुकसान व जीवघेणा प्रवास थांबवावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

Kolhapur News
नेकनूर : शाळेचा रस्ता खराब म्हणून विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीमध्येच भरवली शाळा!

खोंगेवाडी-पावडाईवाडी दरम्यान एक ओढा आहे. पावसाळ्यात हा ओढा दुथडी भरून वाहतो. पाऊस कमी झाल्यास ओढ्यातील पाणी कमी होते. मात्र पाण्याच्या प्रवाहाला मोठी गती असते. त्यामुळे या ओढ्यातून जाताना पाय घसरून अथवा पाण्याच्या प्रवाहाने वाहण्याची भीती असते. ६ ते १० वयोगटातील चिमुकल्यांना या ओढ्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. खोंगेवाडी येथे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून पावडाईवाडी-खोंगेवाडी दरम्यानच्या ओढ्यावरून गेल्यास फक्त एक किलोमीटरच शाळा आहे. अन्यथा तीन किलोमीटरचा वळसा घालून शाळेत जावे लागत असल्याने या ओढ्यातूनच मुले जीवघेणा प्रवास करत आहेत. ओढ्याच पाणी वाढलं की मुलांना शाळेला दांडी मारावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. शाळेत जाण्यासाठी पावसाळ्यात जीवघेणा प्रवास दररोज करावा लागत आहे. येथे लाकडी अथवा लोखंडी साकव उभारावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news