HIV Positive Marriage | ‘पॉझिटिव्ह साथी’ने जुळल्या एचआयव्ही बाधितांच्या रेशीमगाठी

2500 जणांना मिळाला जीवनसाथी; महाराष्ट्रातील 4,500 जणांची विवाहासाठी नोंदणी
HIV Positive Marriag
‘पॉझिटिव्ह साथी’ने जुळल्या एचआयव्ही बाधितांच्या रेशीमगाठी(Pudhari File Photo)
Published on
Updated on

एकनाथ नाईक

कोल्हापूर : एचआयव्हीचा समूळ नायनाट करण्यासाठी राज्यातच नव्हे, तर देशात लढा सुरू आहे. यासाठी शासनाच्या खाद्याला खांदा लावून सामाजिक संस्था काम करत आहेत. एचआयव्हीसह समाजात वावरणार्‍यांच्या जीवनात ‘पॉझिटिव्ह साथी डॉट कॉम’ आणि ‘पॉझिटिव्ह सोल्स फाऊंडेशन ऑनलाईन पोर्टल’द्वारे मोफत 2500 हून अधिक एचआयव्हीबाधितांच्या रेशीमगाठी जुळवून आणल्या आहेत. या पोर्टलवर मोफत नोंदणीची सोय आहे.

‘पॉझिटिव्ह साथी डॉट कॉम’ हे पोर्टल 2006 मध्ये लाँच करण्यात आले. या पोर्टलवर सध्या 3500 जणांनी, तर ऑफलाईन 1000 जणांनी नोंदणी केली आहे. हजारो एचआयव्ही संसर्गितांना या साथीद्वारे आपला जीवनसाथी मिळाला आहे. या पोर्टलवर या आजाराने बाधित झालेल्या अविवाहित आणि घटतस्फोटितांनी नोंदणी केली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील एचआयव्हीबाधितांनीदेखील ऑनलाईन विवाह नोंदणी केली आहे. विवाहानंतर जोडपी जर्मनी, कॅनडा येथे नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाली आहेत.

पॉझिटिव्ह सोल्स फाऊंडेशनच्या माध्यमातून अनिल वळीव, मच्छिंद्र पवार, विनायक कुंभार, जितेंद्र जोशी एचआयव्ही बाधितांना मदतीचा आधार देत आहेत. तसेच स्वाती वळीव यांनी महिला, युवतींचे समुपदेशनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.

HIV Positive Marriag
Kolhapur news | तिरडीच्या काठ्यांनीच फोडली डोकी; पंचगंगा स्मशानात हाणामारी

कोल्हापूरची युवती झाली पंजाबची सून

पंजाब येथील एक तरुण शासकीय सेवेतून निवृत्त झाला होता. त्याला एचआयव्ही झाल्याने आपले लग्न होईल की नाही, या चिंतेत तो होता. त्याने पॉझिटिव्ही साथी डॉट कॉमवर आपली नोंदणी केली होती. येथे त्याला कोल्हापूरच्या युवतीचा बायोडाटा मिळाला. बघण्याचा कार्यक्रम ठरला पंजाबहून मुलगा पुण्यात आला. कोल्हापूरची युवती व नातेवाईक पुण्याला गेले. दोघांना एकमेकांना पसंत केले. त्याच दिवशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुले असून दोन्ही सुखरूप आहेत.

18 वर्षांत 11 टक्क्यांवरून 0.4 टक्के प्रमाण

जिल्ह्यात या रोगाला काही प्रमाणात अटकाव झाला आहे. गेल्या 18 वर्षांत जिल्ह्यात 11 टक्क्यांवरून प्रमाण 0.4 टक्क्यापर्यंत आले आहे. ऑक्टोबरअखेर सुमारे 40 हजार 701 इतक्या गर्भवतींची एचआयव्ही तपासणी झाली. त्यात केवळ 55 गरोदर माता या एचआयव्ही संसर्गित असलेल्या आढळून आल्या. त्यापैकी पूर्वीच्याच 44 माता होत्या. नव्याने केवळ 11 माता पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. गतवर्षी तसेच यंदा पॉझिटिव्ह महिलेच्या पोटी जन्मलेल्या दीड वर्ष पूर्ण झालेल्या 113 मुलांची ऑक्टोबरअखेर अंतिम तपासणी केली असता ही सर्व मुले निरोगी असल्याचे आढळून आले. 2025 मध्ये आरोग्य विभागामार्फत 79,985 इतक्या सामान्य रुग्णांची तपासणी झाली. यामध्ये 305 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. सद्यस्थितीत यातील 302 रुग्णांना एआरटी औषधोपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील लोकसंख्येचा आणि सीमावर्ती भागाचा विचार करता हे प्रमाण 0.4 टक्के आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news