15 वर्षांत तब्बल 185 वेळा प्लेटलेट दान

15 वर्षांत तब्बल 185 वेळा प्लेटलेट दान

[author title="एकनाथ नाईक" image="http://"][/author]

कोल्हापूर :  जगण्याचं कारण समजलेली माणसं हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहेत. त्यातच जर ते कारण लहान वयात समजलं तर कोल्हापूरचा विश्वजित काशीद हा त्याच भाग्यवंतांपैकी एक आहे. तो संगणक अभियंता असून त्याचं काम आरोग्याच्या क्षेत्रात मोठं आहे. 15 वर्षांत दुर्मीळ एबी निगेटिव्ह रक्त गटामध्ये तब्बल 185 वेळा सर्वाधिक प्लेटलेट दान करणारा भारतातील तो एकमेव आहे. त्याची आयएसबीटीआय (Indian Society Of Blood Transfusion And immunohaenmatology) या संस्थेकडे यांची नोंद झाली आहे.

कोल्हापुरातील प्रतिभानगर (सध्या पुणे) येथील विश्वजित काशीद याने वयाच्या 17 व्या वर्षी रक्त गटाची तपासणी करून घेतली. त्यावेळी त्याला रक्तगट एबी निगेटिव्ह असल्याचं समजलं. देशात निगेटिव्ह रक्तगट असणारे खूप कमी असतात. त्यामुळे त्याने देशभरातील हजारहून अधिक संस्थांना याबाबतची माहिती मेल केली. गरजूंना रक्तदानासाठी तयार असल्याचे त्याने या मेलमधून सांगितले. त्यानंतर विश्वजितला रक्तदानासाठी मेल, फोन मेसेज येऊ लागले. जमेल तसं तो रक्तदान करू लागला.

पुण्यात विश्वजितने डिग्रीचं शिक्षण घेऊन तेथेच चांगली नोकरी मिळविली. पण त्याने सामाजिक कार्य थांबविले नाही. कोल्हापुरातील मित्रांसोबत 'करियर गायडन्सचा' कार्यक्रम तो आखायचा. ग्रामीण भागात जाऊन स्वखर्चातून शिक्षणाच्या संधी आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबिर ते घेत होते. 13 ऑगस्ट 2016 ला रात्री दीड वाजता फोन आला. तातडीनं रक्ताची गरज आहे. ससून रुग्णालयात एका मुलाला प्लेटलेटस कमी झाल्या आहेत. आपण त्या डोनेट करू शकतात का? तातडीने विश्वजित तेथे पोहोचला. त्यावेळी एक महिला रक्तपेढीच्या दारात रडत बसल्याचे विश्वजित याला दिसली.

त्यांना त्यांच्या मुलांसाठी प्लेटलेट हव्या होत्या. तत्काळ विश्वजितने त्या मुलाला प्लेटलेट दान केल्या, यानंतर तो डॉक्टरांच्या सल्ल्याने दरवर्षी 24 वेळा प्लेटलेट दान करत आहे. अवघ्या 33 वर्षांच्या विश्वजितने 15 वर्षांत 185 वेळा प्लेटलेट दान करून तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्याचे विनामोबदला हे कार्य सुरू ठेवले आहे. सध्या ते ग्रॅन्युलोसाईट डोनेशनसाठी (पांढर्‍या रक्त पेशी) काम करत आहेत. ते भारताचा गुडविल अ‍ॅम्बेसेडर फॉर प्लेटलेटही डोन आहे. रक्तदान व प्लेटलेट दानाबाबत शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांमध्ये जाऊन मोफत मार्गदर्शन करतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news