Nashik News | मुसळधार पावसामुळे निवाने बारी घाटात कोसळली दरड

वाहतूक झाली ठप्प, शेतातही साचले पाणी
Niwane Bari Ghat
मुसळधार पावसामुळे निवाने बारी घाटात दरड कोसळली व वाहतूक ठप्प झाली. file Photo

देवळा पुढारी वृत्तसेवा ; खर्डे ता. देवळा येथे सोमवारी दि. २४ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून छोटे मोठे ओहळ नाल्यांना पूर आला. मूलूखवाडी येथेही जोरदार पाऊस झाल्यावर निवाने बारी घाटात दरड कोसळली असून वाहतूक ठप्प झाली आहे.

शेतकरी, नागरिकांना दिलासा

खर्डे व परिसरात सुरवातीला पेरनियुक्त पाऊस झाला. पेरणी नंतर यानंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला. सोमवारी दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दुपारी तीन वाजता मुसळधार पावसाने दिलासा मिळाला.

शेतात साचले पाणी

मुलुख वाडी येथील पाझर तलाव पूर पाण्याने भरून गेला. खर्डे सह मुलूखवाडी येथे मुसळधार पाऊस झाला. कधी नव्हे एवढा ढग फुटी सदृश्य पावसाने शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. शेतातले बांध फुटल्याने नुकसान झाले. तसेच ओहळ नाल्यांना देखील पूर पाणी आल्याने नागरिकांना मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मुलूखवाडी, मोतीनंदर शिवारात ढग फुटी सदृश पाऊस झाल्याने येथील निवाने बारी घाटात दरड कोसळली. रस्त्यावर मोठ मोठे दगड येऊन पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मुलूखवाडी शिवारात शेतात पाणी साचले असून येथील पाझर तलाव भरला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news