Nrusinhawadi | नृसिंहवाडीत दीप अमावस्येला दीपपूजन ; दिव्यांच्या प्रकाशात उजळला श्रींचा गाभारा!

नृसिंहवाडी : येथे दीपपूजनाने श्री दत्त मंदिराचा गाभारा उजळून निघाला. (छाया - दर्शन वडेर)
नृसिंहवाडी : येथे दीपपूजनाने श्री दत्त मंदिराचा गाभारा उजळून निघाला. (छाया - दर्शन वडेर)
Published on: 
Updated on: 

नृसिंहवाडी : आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच दीप अमावस्येनिमित्त नृसिंहवाडी येथे दीपपूजनाचा सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. यानिमित्त श्रींच्या मंदिरात दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती.

श्रींच्या गाभाऱ्यात चांदीच्या प्रभावळीसमोर दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. उंच समया व छोट्या दिव्यांना पांढऱ्या शुभ्र फुलांनी सजवण्यात आले होते. दिव्यांच्या शांत व सोनेरी प्रकाशात श्रींचे रूप अधिकच विलोभनीय आणि प्रसन्न दिसत होते.

अज्ञानाचा अंधार दूर करून जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणणाऱ्या या सणाचे महत्त्व सांगणारी ही सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या नयनरम्य दीपोत्सवाचा व श्रींच्या मनमोहक रूपाचा डोळे भरून आनंद घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news