Nrusinghawadi Devasthan Website | नृसिंहवाडी देवस्थानच्या संकेतस्थळाचे लोकार्पण

संकेतस्थळाच्या माध्यमातून देशभरातील दत्तभक्तांना देवस्थानची माहिती, दैनंदिन पूजा, देणगी सुविधा व धार्मिक उत्सवांची माहिती होणार
Datta Temple Narsobachi Wadi  Portal Launch
नृसिंहवाडी : येथे दत्त मंदिराच्या संकेतस्थळाचे लोकार्पण करताना विश्वस्तPudhari
Published on: 
Updated on: 

Datta Temple Narsobachi Wadi Portal Launch

नृसिंहवाडी : नृसिंहवाडी येथील श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देवस्थानच्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. www.dattadevsthannwd.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून देशभरातील दत्तभक्तांना देवस्थानची माहिती, दैनंदिन पूजा, देणगी सुविधा व धार्मिक उत्सवांची माहिती होणार आहे.

या डिजिटल उपक्रमामुळे दत्त मंदिर व भक्तांतील संवाद सुलभ व प्रभावीपणे होणार आहे. नव्या संकेतस्थळाद्वारे या पवित्र क्षेत्राचा इतिहास, परंपरा व आध्यात्मिक वारसा भाविकांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे दत्त देवस्थानचे अध्यक्ष प्रा. गुंडो पुजारी यांनी सांगितले.

Datta Temple Narsobachi Wadi  Portal Launch
Guru Purnima | नृसिंहवाडीत गुरुपौर्णिमा सोहळ्यासाठी भक्ताची मांदियाळी दाखल!

या संकेतस्थळाची संकल्पना व तांत्रिक विकास नुपथ स्पेअर कंपनीने केला आहे. आधुनिक तंत्रज्ञान व भारतीय संस्कृती वारसा यांचा सुंदर संगम या संकेतस्थळात अनुभवायला मिळतो.

ही वेबसाईट मोबाईल टॅब व संगणकावर सहज वापरता येईल अशी रचना करण्यात आली आहे. लोकार्पण कार्यक्रमाचा प्रसंगी अध्यक्ष प्रा. गुंडो पुजारी व विश्वस्त उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news