Management Education New trend | व्यवस्थापन शिक्षणाचा नवा ट्रेंड; विद्यार्थी होणार अपग्रेड!

‘जीएमएसी’चा अहवाल प्रसिद्ध; ब्रॅंडपेक्षा कौशल्यावर भर
Management Education New trend |
Management Education New trend | व्यवस्थापन शिक्षणाचा नवा ट्रेंड; विद्यार्थी होणार अपग्रेड!
Published on
Updated on

प्रवीण मस्के

कोल्हापूर : व्यवस्थापन शिक्षणाशी संबंधित सर्वेक्षणात शिक्षण क्षेत्रातील बदलते ट्रेंड समोर आले आहेत. ग्रॅज्युएट मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन कौन्सिलच्या प्रॉस्पेक्टिव्ह स्टुडंटस् सर्व्हे (जीएमएसी) अहवालामध्ये विद्यार्थ्यांचा ओढा मोठ्या ब्रॅंडपेक्षा कौशल्य, परतावा आणि खात्रीशीर करिअरकडे वाढत आहे.

‘एमबीए’ करण्यामागील विद्यार्थ्यांचे उद्दिष्टही बदलताना दिसत आहे. पूर्वी करिअर बदलण्यासाठी एमबीए करणार्‍यांचे प्रमाण जास्त होते; मात्र आता 72 टक्के विद्यार्थी बिझनेस नॉलेज आणि कौशल्ये वाढवण्यासाठी हा अभ्यासक्रम निवडत आहेत. आर्थिक मंदीची भीती व कौशल्य विकसित करण्याची गरज, यामुळे ट्रेंड वाढला आहे. अनेक विद्यार्थ्यांना व्यवस्थापन शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढवा, असे वाटते.

परदेशात शिक्षणासाठी विद्यार्थी सरासरी 4 ते 5 कॉलेजांमध्ये अर्ज करतात. मात्र, शिक्षणाचा खर्च हा मोठा अडथळा ठरत आहे. सुमारे 46 टक्के विद्यार्थ्यांना फी ही सर्वात मोठी अडचण वाटते. भारतीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण कर्जावर अवलंबून असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. कोरोना काळात वाढलेला ऑनलाईन शिक्षणाचा ट्रेंड आता कमी होत आहे. भारतातील 91 टक्के विद्यार्थ्यांनी फुल-टाईम, क्लासरूममध्ये शिक्षणास प्राधान्य दिले आहे. यात 79 टक्के मुले, 67 टक्के मुलींचा समावेश आहे.

अहवालानुसार, भारतातील सुमारे 91 टक्के विद्यार्थी फुल-टाईम क्लासरूम शिक्षणाला प्राधान्य देत आहेत. कोरोनानंतर वाढलेला ऑनलाईन शिक्षणाचा ट्रेंड आता कमी होत असून, प्रत्यक्ष शिकण्यावर विद्यार्थ्यांचा भर वाढताना दिसतो. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा आधुनिक व्यवस्थापन शिक्षणाचा महत्त्वाचा भाग बनत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news