Kolhapur Flood : कृष्‍णा नदीत वाहून गेलेले ६ जण सुखरूप; दोघांचा शोध सुरू

एनडीआरएफ टीम २ यांत्रिकी बोटींसह रेस्‍क्‍यूसाठी रवाना
NDRF team leaves for rescue of two trapped in Krishna river
Kolhapur Flood : कृष्‍णा नदीत वाहून गेलेले ६ जण सुखरूप; २ जण नदीपात्रात झाडाला अडकलेPudhari Photo
Published on
Updated on

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा

शिरोळ तालुक्यातील (Kolhapur) अकिवाट बस्तवाड दरम्यानच्या कृष्णा नदीच्या (Krishna River) पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली होती. त्‍यामुळे वेगवान पुराच्या पाण्यात 7 ते 8 पडले होते. यातील सुहास पाटील, रोहिदास माने हे अकिवाटकडे पाण्यातून पोहत आले. त्यांना धाप लागल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर तंटामुक्त अध्यक्ष श्रेणिक चौगुले, अरुण कोथळे, सागर माने हे नदीपलीकडे बसवाड हद्दीत पोहत जाऊन ते सुखरूप पोहोचले आहेत.

NDRF team leaves for rescue of two trapped in Krishna river
Kolhapur Flood : अकिवाट-बस्‍तवाड रस्‍त्‍यावर ट्रॅक्‍टर ट्रॉली महापुराच्या पाण्यात उलटली, ३ जण बेपत्‍ता

तर माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार आणि अण्णासाहेब हसुरे हे राजापूर बंधाऱ्याच्या दिशेने वाहत गेले असून शार्दूल रजपूत यांच्या मळीतील एका झाडाला ते पकडून थांबले असल्याचे समजते. एनडीआरएफची टीम त्यांना रेस्क्यू करण्यासाठी जात आहे.

NDRF team leaves for rescue of two trapped in Krishna river
Kolhapur Flood : महापुरामुळे लोकवस्तीत शिरू लागले वन्यप्राणी

सुखरूप सहा जणांना 108 ॲम्बुलन्सने दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अकीवाट येथे घटनास्थळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर सपोनी रविराज फडणीस नायब तहसीलदार योगेश जमदाडे गटविकास अधिकारी नारायण घोलप ग्राम विकास अधिकारी नंदकुमार निर्मळे सह आपत्ती व्यवस्थापन चे पदाधिकारी दाखल झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news