सांगली ः पुढारी वृत्तसेवा
सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस झाला. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात गुरुवारी रात्रभर पाऊस सुरूच होता. शुक्रवारी सकाळपासून सांगली, मिरजेसह शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, जत तालुक्यात पाऊस झाला. नांद्रे, वसगडे, कर्नाळ, मौजे डिग्रज परिसरात दिवसभर पाऊस सुरू होता. शिराळा तालुक्यात धरण परिसरात पावसाचा जोर सुरू आहे.
वारणा नदी पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून मुसळधाार पाऊस पडत आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ठिकठिकाणी वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून वाहत आहे. दरम्यान, वारणा नदीवरील मांगले -सावर्डे दरम्यानचा बंधारा पाण्याखाली गेला असून, या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.