Dhananjay Mahadik | ...अन्‌ खासदार महाडिकांना पडला ‘भाजयुमो’चा विसर?

भाजपच्‍या कार्यक्रमात प्रदेश युवक काँग्रेसचा उल्‍लेख
Dhananjay Mahadik
Dhananjay MahadikPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्‍हापूर : खा. धनंजय महाडिक यांनी नुकतेच भारतीय जनता युवा मोर्चाऐवजी प्रदेश युवक काँग्रेस असा उल्‍लेख केल्‍याने भारतीय जनता युवा मोर्चाचा खा. महाडिकांना विसर पडला की काय? अशी विचारणा होऊ लागली आहे. हे वक्‍तव्‍य सोशल मीडियावर व्‍हायरल झाले. या वक्‍तव्‍यावर टीकेचा भडिमार सुरू आहे.

खा. महाडिक यांचे पुत्र कृष्‍णराज यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्‍या प्रदेशाध्‍यक्षपदी निवड झाली आहे. राहुल गांधी यांच्‍यावरील वक्‍तव्‍य असो अथवा मुंबईतील मनसे आंदोलनासह विविध कारणांनी कृष्‍णराज यांच्‍यावर सोशल मीडियावर टीकाटिपणी सुरू आहे. शुक्रवारी दहिहंडी कार्यक्रमात खा. महाडिक यांनी भाषणात मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्‍णराज याच्‍यावर विश्‍वास टाकून त्‍याची अवघ्या २८ व्‍या वर्षी प्रदेश युवक काँग्रेसच्‍या अध्‍यक्षपदी निवड केल्‍याचे सांगितले. या वक्‍तव्‍याने उपस्‍थितांना हसू आवरता आले नाही. काही अवाक्‌ झाले, तर काहींच्‍या भुवया उंचावल्‍या. बोलण्‍याच्‍या ओघात स्‍वत:च्‍या पक्षाची आठवण राहिली नाही याबाबत आश्‍चर्य व्‍यक्‍त होत आहे. अनेकांनी महाडिकांना काँग्रेसचे वेध लागल्‍याची टीका केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news