कुरूंदवाड : मोटरसायकल चोरीच्या घटनांत वाढ; सीसीटीव्हीची गरज

कुरूंदवाड : मोटरसायकल चोरीच्या घटनांत वाढ; सीसीटीव्हीची गरज

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा येथील मोमीन गल्लीत आठ दिवसात दोन मोटरसायकली चोरीस गेल्या आहेत. सहा महिन्यापूर्वी यामाहा मोटर सायकल चोरीला गेली होती. पोलिसांनी दोन चोरांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदरची दुचाकी हस्तगत केली आहे. मोमीन मोहल्ला येथील सहा महिन्यात तीन मोटरसायकली चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे शहर व परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान शहर व परिसरात चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने शहराचा तिसरा डोळा सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ कार्यान्वित करण्यात यावेत अशी मागणी नागरिंमधून होत आहे.

येथील मोमीन गल्लीतील सोहेल जब्बार मुल्ला यांची हिरो स्प्लेंडर क्र.(एम एच.09बी.डब्ल्यू 8767) ही मोटर सायकल शुक्रवारी मध्यरात्री सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार आज (शनिवार) सकाळी उघडकीस आला. 15 दिवसांपूर्वी नईम साहेबलाल गोलंदाज यांची यामाहा मोटर सायकल क्र (एम.ए. के 167) चोरीस गेली आहे. तर यांचेच चुलत बंधू अयाज रफिक गोलंदाज यांची यामाहा मोटर सायकल क्र.(एम.एच 10 बी2665) सहा महिन्यांपूर्वी चोरीस गेली होती. चिपरी येथील 2 संशयित आरोपींकडून सदरची मोटर सायकल पोलिसांनी जप्त केली होती.

मध्यवस्तीत असणाऱ्या मोमीन गल्लीतील शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुल्ला याची मोटर सायकल चोरीला जाण्याचा सहा महिन्यातील हा तिसरा प्रकार घडल्याने नागरिकांतून उलट सुलट चर्चा रंगली आहे. शहराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासनाने तात्काळ सीसीटीव्ही कार्यान्वित करावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news