Electricity Workers Struggle | 'जनमित्रांचा' पावसाळी संघर्ष: विजेच्या खांबावर मृत्यूशी झुंज

पाऊस म्हणजे अनेकांना दिलासा देणारा, आल्हाददायक अनुभव. पण याच पावसाळ्यात वीज कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात मात्र अनेक धोके आणि आव्हाने उभी राहतात.
Electricity Workers
विजेच्या खांबावर वीज कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून कसरत करावी लागते.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

सुभाष पाटील

विशाळगड : पाऊस म्हणजे अनेकांना दिलासा देणारा, आल्हाददायक अनुभव. पण याच पावसाळ्यात वीज कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात मात्र अनेक धोके आणि आव्हाने उभी राहतात. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रमाणेच हे कर्मचारी दररोज मृत्यूशी झुंज देत आपल्याला अखंडित वीजपुरवठा देण्याचं काम करतात. वादळी वारा आणि मुसळधार पावसात वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास, भर रात्री जीव धोक्यात घालून दुरुस्तीसाठी खांबावर चढावं लागतं. विजेच्या तारेला झालेला एक छोटासा स्पर्शही त्यांच्या आयुष्याचा शेवट ठरू शकतो किंवा कायमचं अपंगत्व आणू शकतो.

या कर्मचाऱ्यांसाठी पावसाळा म्हणजे एक मोठा संघर्ष असतो. बिघाड नेमका कुठे झाला, हे शोधणं हे एक मोठं आव्हान असतं. कधीकधी सर्व खांबांची तपासणी करावी लागते, ज्यामुळे दुरुस्तीला वेळ लागतो. पावसाच्या थेंबांनी गरम झालेले इन्सुलेटर्स फुटू शकतात आणि वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. अशा वेळी ग्राहक वीज कर्मचाऱ्यांवर राग काढतात, पण त्यांच्या या संघर्षाची आणि मेहनतीची कल्पना आपल्याला नसते.

Electricity Workers
Vishalgad : बंदीच्या सावटाखाली विशाळगडावर उरूस

वीज कर्मचाऱ्यांच्या या खडतर आयुष्याचा आणि त्यांच्या कामाचा आदर ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्या कामातील धोके आणि अडचणी समजून घेतल्यास आपण खऱ्या अर्थाने त्यांचे जनमित्र बनू. पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या घरातील वीज जाईल, तेव्हा या कर्मचाऱ्यांच्या अफाट मेहनतीचा आणि संघर्षाचा विचार नक्की करा.

Electricity Workers
Vishalgad Encroachment | विशाळगड हिंसाचार प्रकरणातील २४ पैकी १७ जणांना जामीन मंजूर

"वीज कर्मचाऱ्यांचं काम हे अत्यंत जोखमीचं आहे. अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी आमचे कर्मचारी जीवाची बाजी लावतात. विशेषतः पावसाळ्यात आम्ही २४ तास सेवेसाठी सज्ज असतो. ग्राहकांनीही त्यांच्या कामातील अडचणी आणि धोके समजून घेऊन त्यांना सहकार्य करावं. त्यांनी रागावण्याऐवजी त्यांच्या कामाची प्रशंसा केल्यास आमचं मनोबल वाढेल."

प्रवीण कुंभारे, उपकार्यकारी अभियंता, शाहुवाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news