बाळूमामा देवस्थानला ‘अ’ वर्ग दर्जा मिळण्यासाठी प्रयत्नशील: आमदार रोहित पवार

बाळूमामा देवस्थानला ‘अ’ वर्ग दर्जा मिळण्यासाठी प्रयत्नशील: आमदार रोहित पवार
Published on
Updated on

मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा : बाळूमामा देवालयाचा पर्यटनाच्या दृष्टीने 'अ' वर्ग दर्जा देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवू, त्यासाठी प्रयत्नशील राहु, असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले. आदमापूर (ता. भुदरगड) येथे आज (दि.२३) त्यांनी सद्गुरू बाळूमामा यांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी विशेष बाब म्हणून बाळूमामा देवालयाच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी देण्यासाठी शासनाला भाग पाडू, असे त्यांनी सांगितले. कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत आदमापूरसाठी घंटागाडी देण्याचे अभिवचन त्यांनी दिले. तसेच अमावस्या व प्रत्येक रविवारी होणार्‍या वाहतूक व्यवस्थापनासाठी शासन दरबारी प्रश्न मांडू, असेही आमदार पवार यांनी सांगितले.

यावेळी मंदिरामध्ये रोहित पवार यांचा फेटा बांधून व घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला. आमदार पवार यांना ग्रामपंचायतीच्या वतीने विकासकामांचे निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे व देवस्थानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सरपंच विजय गुरव, एस. के. पाटील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news