

कोल्हापूर : सुनील कदम
राज्यातील तरुणाईला जणू काही रोजगाराची 'अॅलजी' असल्यासारखी अवस्था झाली आहे. परिणामी, राज्यातील रोजगारांच्या बहुतेक सगळ्या क्षेत्रात परप्रांतीयांची मक्तेदारी निर्माण झालेली दिसत आहे.
महाराष्ट्रातून वर्षाकाठी १.२५ लाख कोटी रुपये परप्रांतात जात आहेत. 'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी'च्या (सीएम आपई) अहवालानुसार राज्यात दैनंदिन रोजगाराच्या ५० लाख ते १ कोटी संधी उपलब्ध आहेत. यामध्ये काही हंगामी आणि कंत्राटी नोकऱ्या आणि मनरेगा अंतर्गत कामांचाही समावेश आहे. मात्र, या रोजगार संधीचा लाभघेण्याची मनोवृत्ती महाराष्ट्रीयन तरुणांमध्ये अत्यंत कमी आहे. त्याच्या नेमकी उलट अवस्था परप्रांतीय तरुणांची आहे. मिळेल तो आणि पडेल तो रोजगार करून चार पैसे गाठीला मारण्याची त्यांची तयारी असते. त्याचाच परिणाम म्हणून आज राज्यातील झाडून सगळ्या रोजगार क्षेत्रांबर परप्रांतीय लोकांनी किंवा तरुणांनी कब्जा केलेला दिसत आहे. ८० लाख परप्रांतीय !
राज्यात रोजगाराच्या माध्यमातून रोजी-रोटी कमावण्यासाठी आलेल्या परप्रांतीय लोकांची संख्या जवळपास ८० लाखांच्या घरात आहे. या मंडळींना वार्षिक सुमारे १.२५ लाख कोटींचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रीयन तरुणाईनेही या रोजगार संधींकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची गरज आहे. रिकामटेकडे उद्योग करण्यापेक्षा या रोजगार संधी केव्हाही चांगल्याय म्हणाव्या लागतील.
परप्रांतीयांच्या ताब्यात गेलेली रोजगार क्षेत्रे
महानगरांमधील रिक्षा-टॅक्सी चालक, बांधकाम, गिलावा, फरशी, बोरिंग मशिन, रस्ते आणि महामार्गाची कामे, राज्यभरातील वेगवेगळे खाद्यपदार्थांचे छोटे-छोटे व्यवसाय, औद्योगिक वसाहतीमधील रोजंदारीची आणि मेहनतीची कामे, हटिल कामगार, भाजीपाला आणि फळविक्रेते, मनरेगावरील कामे, द्राक्ष, ऊस आणि फळ शेतीमधील मजुरी, बॉचमन, मोबाईल दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक वस्तूंची दुरुस्ती, केश चप्पल विक्रेता, फिरते विक्रेते, सफाई कामगार, नारळपाणी, सरबत, क. विक्री, प्रवासी वाहतूक यांसह जवळपास प्रत्येक क्षेत्रातील दैनंदिन रोजगाराच्या संधी परप्रांतीय लोकांनी किंवा प्रामुख्याने तरुणांनी काबीज केलेल्या दिसतात.