Marathi Chitrapat Mahamandal Election Results | कोल्हापूर ब्रेकिंग : मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत 'समर्थ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

सतीश रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील चित्रकर्मी पॅनेलला पराभवाचा धक्का
Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal Election 2026
Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal Election 2026Pudhari
Published on
Updated on

Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal Election 2026

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज भोसलेंच्या नेतृत्वाखाली 'समर्थ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात सोमवारी (दि.८) सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरूवात होऊन निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी विजयी उमेदवारांकडून गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.

कोल्हापूरसह पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर येथे राज्यातील १२ केंद्रांवर ४९.९० टक्के मतदान झाले होते. या मतदानात ३४०३ पैकी १६९८ मतदारांनी मतदान केले. राज्यातील एकूण टक्केवारीत कोल्हापुरातील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल केंद्रावर सर्वाधिक मतदान झाले होते.

Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal Election 2026
Marathi Chitrapat Mahamandal Election: चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ४९ टक्के मतदान; आज निकालाची उत्सुकता

मेघराज भोसलेंच्या नेतृत्वाखाली 'समर्थ पॅनेल’चे विजयी उमेदवार

मेघराज राजेभोसले - निर्माता

सुनील महाजन - निर्माता

दिपक कदम - दिग्दर्शक

अजित शिरोळे - दिग्दर्शक

राज काझी - लेखक

सुशांत शेलार - अभिनेता

धनाजी यमकर - छायाचित्रण

शरद चव्हाण - ध्वनीरेखक

रवी गावडे - निर्मिती व्यवस्था

सुभाष नकाशे - नृत्य दिग्दर्शक

प्रवीण (वासू )पाटील - कला दिग्दर्शक

चैत्राली डोंगरे - रंगभूषा/वेशभूषा

गणेश गारगोटे - वितरण/प्रसिध्दी

विकास तोरणे - कामगार

Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal Election 2026
Marathi Chitrapat Mahamandal Election : आरोप-प्रत्यारोपांत हरवला विकासाचा मुद्दा

तब्बल नऊ वर्षांनंतर चित्रपट महामंडळाची निवडणूक

तब्बल नऊ वर्षांनंतर चित्रपट महामंडळाची निवडणूक होत असल्याने सर्व चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले होते. महामंडळाच्या १७ जागांसाठी सुरुवातीला ६० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १३ जणांनी माघार तर ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे १४ जागांसाठी ४४ उमेदवारांमध्ये चुरशीची लढत रंगली होती. मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेल, सतीश रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील चित्रकर्मी पॅनेल आणि १६ अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीचे चित्र अधिकच रंगतदार बनले होते. कोल्‍हापूरसह सर्वच मतदान केंद्रांवर चुरशीने मतदान झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news