kolhapur | कुख्यात ‘एसटी ऊर्फ साई गँग’चा म्होरक्या गेंड्यासह ५ गुंडांवर ‘मोका’

पोलिस महानिरीक्षकांची मंजुरी : खून, खंडणीसह ३० गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड
kolhapur |
kolhapur | कुख्यात ‘एसटी ऊर्फ साई गँग’चा म्होरक्या गेंड्यासह ५ गुंडांवर ‘मोका’
Published on
Updated on

कोल्हापूर : ३० हून अधिक गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या आणि राजारामपुरीसह परिसरात दहशत माजविणाऱ्या कुख्यात ‘एसटी ऊर्फ साई गँग’चा म्होरक्या ऋषीकेश ऊर्फ गेंड्या बाबासो चौगुले (वय २७, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) याच्यासह पाच गुंडांवर ‘मोका’अंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षक निरंजनकुमार शर्मा यांनी शुक्रवारी मंजुरी दिली.

म्होरक्या गेंड्या चौगुलेसह साथीदार विशाल ऊर्फ अविनाश माने ऊर्फ गोट्या लातूर (२७), अजय माने ऊर्फ अज्या लातूर (२५), अमित सुरेश दिंडे (२८, रा. राजारामपुरी, सध्‍या रा. रेणुका कॉलनी, उजळाईवाडी), रामा मुकुंद कलकुटगी (२५, चौदावी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

प्रतिस्पर्धी टोळ्यांचे वर्चस्व मोडीत काढण्याबरोबर व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी वसुली, अपहरण, खून, खुनाचा प्रयत्न, पोक्सो, आर्म ॲक्टसह ३० पेक्षा जादा गंभीर गुन्ह्यांचे गँगचे रेकॉर्ड आहे. टोळीने १४ मे २०२६ रोजी राजारामपुरीतील व्यापाऱ्याला धमकी देऊन दरमहा ५ हजारांच्या खंडणीची मागणी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news