Kolhapur Matka | खुलेआम मटका... कधी होणार सुटका?

चोरी-छुपे नव्हे, आता थेट चिठ्ठीद्वारेच; शहर, जिल्‍ह्यातील बुकींचे पोलिसांसमोर आव्हान
Kolhapur Matka |
Kolhapur Matka | खुलेआम मटका... कधी होणार सुटका?
Published on
Updated on

दिलीप भिसे

कोल्हापूर : दीड-दोन वर्षांपासून ‘चोरी-छुपे’ सुरू असलेच्या मटक्यातील उलाढाल पंधरवड्यापासून खुल्लम खुल्ला सुरू झाली आहे. पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पदभार स्वीकारताच मटका, जुगार अड्ड्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश जारी केले असतानाही शहर, जिल्ह्यात ऑनलाईन, मोबाईलवरील मटका आता चिठ्ठ्यांवर आला आहे. वरिष्ठांच्या सूचनांकडे स्थानिक यंत्रणांकडून डोळेझाक होत असल्याचे चित्र आहे. मटका बुकींसह जुगार अड्ड्यांचे आव्हान पोलिस थोपविणार का, हा प्रश्न आहे.

शहर, जिल्ह्यात फोफावणाऱ्या गुन्हेगारी, संघटित टोळ्यांच्या म्होरक्यांची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्यापाठोपाठ पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनीही अवैध व्यवसायांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले; मात्र वरिष्ठांच्या आदेशाचा कितपत अमल होतो, हा प्रश्न आहे. जिल्ह्यातील अनेक बुकी मुंबईतील टोळ्यांच्या संपर्कात आहेत.

दि. २५ मेपासून जिल्ह्यात त्यांचे नेटवर्क नव्याने सुरू झाले आहे. दीड-दोन वर्षांपासून ‘चोरी-छुपे’ सुरू असलेला मटका आता थेट चिठ्ठ्यांद्वारे खेळला जात आहे. कागल, गडहिंग्लज, मुरगूड, करवीर, हातकणंगले, शिरोळ, कुरूंदवाड, जयसिंगपूर, शहापूर, कबनूर परिसरात मटका बुकींसह त्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news