Minor Girl Assault | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणास २० वर्षांचा कारावास

Minor Girl Assault |
Minor Girl Assault | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणास २० वर्षांचा कारावास
Published on
Updated on

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी आरोपी सुदर्शन ऊर्फ करण शंकर मदने (वय २७, रा. महादेव मंदिराजवळ, मौजे तासगाव, ता. हातकणंगले) यास शुक्रवारी दोषी ठरविले. २० वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा आरोपीला ठोठावण्यात आली.

जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२१ या काळात हा प्रकार घडला. ओळखीचा फायदा घेत आरोपीने मुलीला घरी सोडतो, असे सांगून खोलीत नेऊन मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, असे सांगून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. पीडित गर्भवती राहिली. मुलीने हा प्रकार पालकांना सांगताच या प्रकरणाला वाचा फुटली.

आरोपीविरुद्ध वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वेंजने यांनी आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोप दाखल केले. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश पेरमपल्ली यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील ॲड. राजेश व्ही चव्हाण यांनी खटल्यात ७ साक्षीदार तपासले. ॲड. चव्हाण यांनी केलेला युक्तिवाद, वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे, प्रत्यक्ष दाखल पुरावा ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपी मदने याला दोषी ठरविले. त्‍यानुसार २० वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा आरोपीला ठोठावण्यात आली. पीडित मुलीला भरपाईपोटी एक लाख रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news