Two-Wheeler Theft | जुगारात हरला... कर्जबाजारी झाला अन् दुचाकी चोरल्या

कोडोलीच्या चोरट्यास अटक; चार दुचाकी जप्त
Two-Wheeler Theft |
Two-Wheeler Theft | जुगारात हरला... कर्जबाजारी झाला अन् दुचाकी चोरल्या
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : जुगाराच्या नादात पैसे हरल्यामुळे कर्ज भागवण्यासाठी दुचाकींची चोरी करून कर्ज भागवण्याचा फंडा चोरट्याने अवलंबल्याचे समोर आले. या प्रकरणी जयकुमार राजेंद्र पाटील (वय ३१, रा. मगदूम गल्ली, कोडोली, ता. पन्हाळा) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.

गुरुवारी (ता. १९) दुपारी आदित्य कॉर्नर परिसरातून विठ्ठल सुतार (४३, रा. सरनोबतवाडी) यांची दुचाकी चोरीस गेली होती. याचा तपास शाहूपुरी पोलिसांकडून सुरू होता. परिसरातील सीसीटीव्हीवरून जयकुमार पाटील याने दुचाकीची चोरी केल्याची माहिती समोर आली. तो रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना मिळाली होती. डी. बी. पथकातील कर्मचाऱ्यांनी या परिसरात सापळ रचून जयकुमारला ताब्यात घेतले. त्याला दुचाकीबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आणखीन चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

जुगाराचा नाद...

संशयित जयकुमारचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले असून, तो चालकाचे काम करतो. त्याला जुगाराचा नाद असून, यामध्ये त्याने लाखो रुपये गमावले आहेत. यातून झालेल्या कर्जातून सुटका करून घेण्यासाठी त्याने दुचाकींची चोरी करून त्याची विक्री केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.