K.P.Patil : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा : माजी आमदार के. पी. पाटील

मुदाळ (ता. भुदरगड) येथे पदवीधर व शिक्षक मेळावा
K.P.Patil : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा : माजी आमदार के. पी. पाटील
Published on: 
Updated on: 

मुदाळतिट्टा : पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले.

मुदाळ (ता. भुदरगड) येथे आयोजित पदवीधर व शिक्षक मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी भाजपचे आमदार प्रमोद जठार प्रमुख उपस्थित होते. पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांनी ठेवावे. कोणतीही शंका मनात न बाळगता दोन्ही उमेदवारांना पसंतीक्रमांक एकचे मतदान करून विजयी करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

मेळाव्याचे स्वागत व प्रास्ताविक एस. कुदळे यांनी केले. यावेळी मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष मधुअप्पा देसाई, पंडितराव केणे, विश्वनाथ कुंभार, बापूसाहेब आरडे, विलासराव कांबळे, बाजार समितीचे अध्यक्ष शेखर देसाई, गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील, विकास पाटील आणि सुनील कांबळे आदी उपस्थित होते. विश्वनाथ कुंभार यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news