Maharashtra Kesari 2026 : कोल्हापुरी झंझावाताने कुस्तीचे मैदान मारले! 68 व्या महाराष्ट्र केसरीत ‌‘शाहूनगरी‌’चा डंका

गुणतालिकेत अव्वल स्थान
Maharashtra Kesari 2026 : कोल्हापुरी झंझावाताने कुस्तीचे मैदान मारले! 68 व्या महाराष्ट्र केसरीत ‌‘शाहूनगरी‌’चा डंका
Published on
Updated on

पुणे : लाल मातीतील घाम, शड्डूचा घुमणारा आवाज आणि अंगावर शहारे आणणाऱ्या डावपेचांच्या साक्षीने पार पडलेल्या 68 व्या वरिष्ठ अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या वाघांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या स्पर्धेत कोल्हापूर शहर संघाने प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवत 196 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरने पुन्हा एकदा मैदान मारून आपली परंपरा अधोरेखित केली.

या स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंचा दबदबा सुरुवातीपासूनच पाहायला मिळाला. 57 किलो, 61 किलो, 74 किलो, 92 किलो आणि 97 किलो अशा महत्त्वाच्या वजन गटांमध्ये प्रत्येकी 25 गुण मिळवत कोल्हापूर शहर संघाने एकूण 196 गुणांची उत्तुंग झेप घेतली आणि प्रथम क्रमांक पटकावला. केवळ शहरच नव्हे, तर कोल्हापूर जिल्हा ‌‘अ‌’ संघानेही 90 गुणांसह द्वितीय स्थान मिळवत कुस्तीच्या नकाशावर जिल्ह्याचा प्रभाव कायम राखला.

सोलापूरच्या मल्लांनीही कडवी झुंज दिली. सोलापूर शहर संघाने 86 गुणांसह तृतीय स्थान मिळवून आपली चमक दाखवली. पुणे जिल्हा ‌‘अ‌’ संघ 75 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला, तर सांगली (69 गुण) आणि सातारा (61 गुण) या संघांनी अनुक्रमे पाचवा आणि सहावा क्रमांक मिळवला. बीड आणि सोलापूरच्या इतर उपसंघांनीही या महाकुंभात आपला सहभाग नोंदवून स्पर्धेची रंगत वाढवली.

नव्या पर्वाची नांदी

या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मल्लांनी आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले. स्पर्धेचे संचालक दिनेश गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. कोल्हापूरच्या या ऐतिहासिक विजयामुळे कुस्ती क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, आता हे मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा तिरंगा फडकावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news