

बांबवडे : महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने २० जुलै, २०२६ रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. यामध्ये "ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान" या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत गावांच्या विकासासाठी कामांची व्याप्ती वाढवून नवीन ५ कामांना मंजुरी दिली आहे.
यामुळे आता गावांचा विकास आणखी वेगाने होण्यास मदत होणार आहे,गावातील पायाभूत कामाचा यात समावेश असून यातून होणारी विकास कामे कोणती आणि त्या कामासाठी कामासाठी किती निधी मिळणार याचा तपाशील पुढीलप्रमाणे;
नवीन मंजूर झालेली कामे आणि खर्चाची मर्यादा:
गावांमध्ये सार्वजनिक दिवाबत्तीची सोय करणे:** मर्यादा **रु. १५.०० लाख
शासकीय कार्यालयांवर सोलर पॅनल बसविणे:** मर्यादा **रु. २०.०० लाख
वाचनालय इमारत बांधकाम करणे:** मर्यादा **रु. २०.०० लाख
क्रीडांगण विकास करणे (खेळाडूंच्या सोयीसाठी):** मर्यादा **रु. २०.०० लाख
गावाच्या हद्दीतील शासकीय जागेचे सौंदर्यीकरण करणे:** मर्यादा **रु. १५.०० लाख
महत्त्वाच्या अटी व नियम
या योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे इतर कोणत्याही शासकीय योजनेमधून दुबार, घेता येणार नाहीत. सदर कामांमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मोठी मदत होणार आहे.