LPG Black Market : कुरुंदवाडमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार; 'त्‍या' रिक्षाचालकावर कारवाईची मागणी

ही विक्री रात्रीच्या सुमारास गुप्तपणे होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Gas Black Marketing
LPG Black Market : कुरुंदवाडमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार; 'त्‍या' रिक्षाचालकावर कारवाईची मागणीfile photo
Published on
Updated on

LPG Black Market: Gas Cylinder Black Marketing in Kurundwad; Demand for Action Against 'That' Rickshaw Driver

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा काही रिक्षाचालकांच्या माध्यमातून काळाबाजार सुरू आहे. नांदणी, शिरढोण व शिरोळ परिसरातून गॅस टाक्या आणून त्या कुरुंदवाडमध्ये दोन हजार रुपयांपेक्षा अधिक दराने विकल्या जात आहेत. ही विक्री रात्रीच्या सुमारास गुप्तपणे होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Gas Black Marketing
LPG Black Market | युद्धाच्या सावटाखाली गॅसचा ‘काळाबाजार’; ग्राहकांची अडवणूक सुरु

शहरातील बागवान गल्ली परिसरात चिकन दुकानाच्या आडोशाला राहणारा एक रिक्षाचालक या व्यवहारात सक्रिय आहे. संबंधित व्यक्ती रात्री उशिरा काही ठरावीक ग्राहकांनाच सिलेंडर पुरवत असल्याने हा प्रकार संघटित स्वरूपाचा असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

सध्या गॅस सिलेंडरची उपलब्धता मर्यादित असल्याने नागरिकांना जास्त दर मोजावे लागत आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काळाबाजार सुरू असल्याचे दिसून येते. हे सिलेंडर नेमके कोण पुरवते व कोणत्या एजन्सीतून बाहेर पडतात, याबाबत स्पष्टता नसल्याने संबंधित रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करून एजन्सींची चौकशी करण्याची मागणी होत आहे. काळाबाजार करणाऱ्या रिक्षाचालकासह संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Gas Black Marketing
Illegal LPG refilling | कुरुंदवाड येथे घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर; व्यावसायिक सिलिंडरमध्ये ट्रान्सफरचा प्रकार उघड

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. भारताला आणि जगाला ज्या हॉर्मुझ सामुद्रधुणीतून गॅस आणि इंधनाचा पुरवठा होतो. अमेरिका आणि इराण यांच्यातली चर्चा फिस्कटल्याने पुन्हा एकदा इराणने हॉर्मुझची सामुद्रधुणी तेल आणि गॅस वाहून नेणाऱ्या जहाजांसाठी बंद केली आहे. त्‍याचा परिणाम इतर देशांवर होत आहे.

दरम्यान अनेक ठिकाणी काही लोकांकडून गॅसचा काळाबाजार आणि गॅस टाकी जास्त दराने विकण्याच्या घटना समोर येत आहेत. त्‍यातच गरजु लोकांना गॅस अधिक पैसे मोजून घ्यावा लागत असल्याने गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सीज आणि लोकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news