वडील कार मागे घेताना धडकून चिमुरडीचा मृत्यू

वडील कार मागे घेताना धडकून चिमुरडीचा मृत्यू

नूल, पुढारी वृत्तसेवा : वडील मोटार मागे घेत असताना मोटारीला धडकून दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला. क्रिशिका अमित रामपुरे असे तिचे नाव आहे. निलजी (ता. गडहिंग्लज) येथे बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

अमित दयानंद रामपुरे (वय 34) निलजी येथे राहतात. शेती बघत मोटार भाड्याने देण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. पत्नी व दोन मुलांसह खासगी कामासाठी ते परगावी चालले होते. पत्नी घरात तयारी करत होती. यावेळी गाडी मागे वळवून घेत असताना घरातून अचानक क्रिशिका पळत आली आणि मागच्या बाजूला धडकली. यात ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या मागे आई-वडील, दोन वर्षांचा मोठा भाऊ, आजी-आजोबा असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news