कोल्हापूर: आजर्‍यात साडेचार लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

कोल्हापूर: आजर्‍यात साडेचार लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त
Published on
Updated on

आजरा: पुढारी वृत्तसेवा: आजरा-गडहिंग्लज मार्गावर हिक्टोरिया पूलाजवळ साडे चार लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले. ही कारवाई गडहिंग्लज राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली. या प्रकरणी शिवाजी अनंता धायगुडे (वय ५५, रा. फातिमानगर, पुणे) यास चारचाकी (एमएच १२ डी वाय ४५९३) सह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रविंद्र आवळे यांच्या आदेशानुसार गोवा बनावट मद्याची विक्री व वाहतूक कोल्हापूर जिल्ह्यात होऊ नये, यासाठी कारवाईचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गडहिंग्लज राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक सचिन भवड, दुय्यम निरीक्षक किरण पाटील, लक्ष्मण पाटील, भरत सावंत, संदिप जानकर, संदिप चौगुले आजरा तालुक्यात गस्त घालत होते.

यावेळी आजराजवळील व्हिक्टोरिया पूलानजीक धायगुडे याची संशयित चारचाकी आढळून आली. वाहनाची तपासणी करण्यात आल्यानंतर कारमध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे ३५ बॉक्स आढळून आले. गाडीसह एकूण ४ लाख ४८ हजार ५२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news