सरोज पाटील, शांतादेवी पाटील यांना राष्ट्रमाता जीवनगौरव पुरस्कार

सरोज पाटील, शांतादेवी पाटील यांना राष्ट्रमाता जीवनगौरव पुरस्कार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याच्या संकल्पक राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी (दि. 12 जानेवारी) निमित्त मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट व अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्यावतीने जिल्ह्यातील कर्तबगार माता-भगिनींसाठीच्या राष्ट्रमाता जिजाऊ जीवनगौरव, क्रीडारत्न, समाजभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदा पहिला जीवनगौरव पुरस्कार श्रीमती सरोज नारायण तथा एन. डी. पाटील व सौ. शांतादेवी ज्ञानदेव तथा डी. वाय. पाटील यांना जाहीर झाला आहे. अ. भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुरस्कार वितरण व जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित महिलांच्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ शुक्रवार, दि. 19 रोजी सकाळी 11 वाजता, राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे होणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, शैलजा भोसले आदी उपस्थित होते.

पहिल्या जिजाऊ पुरस्काराने यांचा गौरव...

सरोज नारायण पाटील : जीवन गौरव पुरस्कार, शांतादेवी ज्ञानदेव पाटील : जीवन गौरव पुरस्कार, शैलजा साळोखे : क्रीडारत्न पुरस्कार, सरलाताई पाटील : समाजभूषण पुरस्कार, पद्मजा तिवले : समाजभूषण पुरस्कार, शैलजा सूर्यवंशी : समाजभूषण पुरस्कार, मेघा पानसरे : समाजभूषण पुरस्कार, हशमत हावेरी : समाजभूषण पुरस्कार, सीमा पाटील : समाजभूषण पुरस्कार, तनुजा शिपूरकर : समाजभूषण पुरस्कार.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news