

कासारवाडी : हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव परिसरात नागरीकांना उसाच्या शेत रस्त्याच्या बाजूलाच बिबट्या वावरताना नागरिकांच्या स्पष्ट निदर्शनास आला. दोन दिवसापासून वन विभागाच्या मार्गावर होते मात्र त्यांना चकवा देत होता. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांच्यात भिंतीचे वातावरण पसरले आहे.
मागील काही दिवसापासून या परिसरात महिलांनी व शेतकऱ्यांच्या निदर्शनास बिबट्या येत होता. त्याच्या पायाचे ठसे यावरून त्याचा वावर स्पष्ट होत होता. या परिसरात वन विभाग शोध घेत होती मात्र त्यांना चकवा देत होता. दोन दिवसांपूर्वीच रात्री जुने पारगाव च्या स्मशानभूमीजवळ भटाचा शेत या ठिकाणी रात्री कामगार घरी जात असताना दीडच्या सुमारास उसाच्या शेताच्या बांधावरून बिबट्या वावरताना कामगारांच्या निदर्शनास स्पष्टपणे दिसून आला. दोन दिवसापासून या बिबट्याला वन विभागाची टीम शोधत होती. मात्र याने वन विभागाला चकवा दिला होता.
परिसरात उसाचे क्षेत्र अधिक आहे आणि सध्या ऊस तोडणी सुरू असल्यामुळे बिबट्यांच्या निदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच रात्रीचे जाणारा कामगार वर्ग हे यामुळे भीतीच्या जाहीर झाले आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी काळजी घ्यावी. रात्रीचे शेतात एकटे जाणे टाळावे. वन विभाग च्या दृष्टीने पाहणी करत आहे. बिबट्या निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क करावा.
नंदकुमार नलवडे वनपरिक्षेत्र अधिकारी, करवीर