पहा थरारक Video! वनविभागाच्या धाडसी प्रयत्नांना यश; दीड तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद

पहा थरारक Video! वनविभागाच्या धाडसी प्रयत्नांना यश; दीड तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद

कोल्हापूर शहरात काल पासून मोठा गोंधळ उडाला. विवेकानंद कॉलेज परिसरात आणि हॉटेल वूडलँडच्या आसपास बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Published on

कोल्हापूर शहरात काल पासून मोठा गोंधळ उडाला. विवेकानंद कॉलेज परिसरात आणि हॉटेल वूडलँडच्या आसपास बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काल रात्री मेरी वेदर ग्राउंड परिसरात काही वाहनचालकांना बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली होती, हा बिबट्या प्रत्यक्ष शहराच्या मध्यवस्तीत दाखल झाला.

पहा थरारक Video! वनविभागाच्या धाडसी प्रयत्नांना यश; दीड तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद
Kolhapur Leopard Attack: कोल्हापूर शहरात बिबट्याची एन्ट्री! वनरक्षकावर हल्ल्याचा थरारक व्हिडिओ व्हायरल

सुमारे दीड तासाच्या प्रयत्नानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यात यश मिळवले. त्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आले. या मोहिमेदरम्यान वनरक्षक ओंकार काटकर यांच्यावर बिबट्याने हल्ला केला, मात्र त्यांना किरकोळ दुखापत झाली असून ते सध्या सुरक्षित आहेत.

वनविभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी अतिशय संयम आणि कौशल्य दाखवत ही संपूर्ण कारवाई पूर्ण केली. बिबट्याला पकडल्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. तो नजीकच्या जंगलातून अन्नाच्या शोधात शहरात आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पहा थरारक Video! वनविभागाच्या धाडसी प्रयत्नांना यश; दीड तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद
Kolhapur Air pollution|भूपृष्ठीय ओझोनचा धोका; कोल्हापूरची हवा बनतेय विषाक्त

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका बंगल्यातून हा बिबट्या थेट हॉटेल वूडलँडच्या गार्डनमध्ये उडी घेतली. त्या ठिकाणी काम करणाऱ्या माळीवर त्याने अचानक हल्ला केला. माळी किरकोळ जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर हॉटेलमध्ये काम करणाऱ्या निखील कांबळे या कर्मचाऱ्यावरही बिबट्याने झडप घातली.

यानंतर बिबट्या थेट बीएसएनएल कार्यालयात शिरला आणि तिथून पुन्हा महावितरण कार्यालयातील एका चेंबरमध्ये गेला. त्याठिकाणी तो बराच वेळ लपून बसला होता. या संपूर्ण घटनेने शहरातील उच्चभ्रू परिसरात भीतीचं सावट पसरलं. पोलिस आणि वनविभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसर पूर्णपणे बंद केला. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, या घटनेमुळे कोल्हापूर शहरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यापूर्वीही २०१५ साली रुईकर कॉलनी आणि १९९५ साली कसबा बावडा परिसरात बिबट्या दिसला होता. त्या दोन्ही घटनांमध्येही भीषण प्रसंग घडले होते.

सध्या वनविभाग आणि पोलिसांचा ताफा विवेकानंद कॉलेज परिसरात तैनात असून, नागरिकांना अनावश्यक गर्दी न करण्याचे आणि शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याला यशस्वीरित्या पकडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news