Kolhapur News: कोपेश्वर मंदिराची तटबंदी खुली करण्यास १८ घरांवर टांगती तलवार

कोपेश्वर मंदिराची तटबंदी स्पष्ट दिसावी यासाठी अडसर ठरणाऱ्या १८ मिळकतींचे प्रशासनाकडून गोपनीय मोजमाप व सर्वेक्षण केल्याची माहिती समोर आली आहे.
Kopeshwar Temple Khidrapur
Kopeshwar Temple Khidrapur file photo
Published on
Updated on

Kolhapur Kopeshwar Temple Khidrapur

कुरुंदवाड : जमीर पठाण

खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शासनाने २४ कोटी रुपयांचा निधी देत तटबंदी, घाट आणि रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. मात्र, तटबंदी स्पष्ट दिसावी यासाठी अडसर ठरणाऱ्या १८ मिळकतींचे प्रशासनाकडून गोपनीय मोजमाप व सर्वेक्षण केल्याची माहिती समोर आली आहे. तटबंदी दर्शनासाठी सुमारे चार एकरांहून अधिक जागा खुली करण्याचा प्रस्ताव आहे.

यासाठी ग्रामस्थांचा संभाव्य विरोध टाळण्यासाठी काही प्रक्रिया जाणीवपूर्वक गुप्तपणे राबवल्या जात आहेत. ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाकडे माहिती घेतली असता 'आमच्याकडे याबाबत कोणतीच माहिती नाही,' असे उत्तर मिळत आहे. लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता प्रशासनाच्या बैठका झाल्या असून, या आडमुठ्या धोरणामुळे नाराजी पसरली आहे.

Kopeshwar Temple Khidrapur
Kolhapur Municipal Corporation | शंभर कोटींच्या जागेवर घाव, आरक्षण उठविण्याचा डाव

महापुराचे कारण दाखवत मंदिरासमोरील मिळकतींचे २ वर्षांपूर्वी मोजमाप करण्यात आले होते. तटबंदी स्पष्ट करण्याच्या नावाखाली त्या मिळकती हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यापूर्वी स्थलांतराच्या फॉर्मवर सह्या घेण्याचा प्रयत्न झाला होता, याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता. तो अनुभव असतानाही प्रशासन पुन्हा त्याच दिशेने पावले टाकत असल्याची टीका होत आहे.

विकासाला विरोध नाही; मात्र पारदर्शकता आणि ग्रामस्थांचा विश्वास आवश्यक आहे. सर्वेक्षण व संभाव्य स्थलांतराबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी.

सारिका कदम,सरपंच, खिद्रापूर ग्रामपंचायत

विकासाच्या नावाखाली स्थानिकांना विस्थापित केले जाणार आहे. निर्णय प्रक्रिया पारदर्शक असावी. प्रशासनाने पडद्यामागील हालचाली करण्याऐवजी ग्रामस्थांसमोर उघड भूमिका मांडावी.

गणेश पाखरे, ग्रामस्थ

Kopeshwar Temple Khidrapur
Vasai Fort Wall Collapse: जंजिरे वसई किल्ल्याची तटबंदी कोसळली; पुरातत्त्व विभागावर निष्काळजीपणाचे आरोप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news