Kolhapur Zilla Parishad : जि.प. भरतीसाठी प्रवेश परीक्षा पत्र वेबसाईटवर

शिक्षक भरती
शिक्षक भरती

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेतील 19 संवर्गांतील 728 पदांच्या भरतीसाठी पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार्‍या परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेश परीक्षा पत्र जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी वेळेचे काटेकोरपणे पालन करावे, कोणतीही सवलत दिली जाणार नाही, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

जिल्हा परिषदेतील सरळ सेवा भरतीसाठी 728 पदांकरिता 35 हजार 908 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. पहिल्या टप्प्यात दि. 7 रोजी सकाळी 11 वाजता रिंगमन-दोरखंडवाला व दुपारी 3 वाजता वरिष्ठ सहायक, दि. 8 रोजी दुपारी 3 वाजता विस्तार अधिकारी, सांख्यिकी, दि. 10 रोजी रोजी सकाळी 11 वाजता विस्तार अधिकारी कृषी व दुपारी 3 वाजता आरोग्य पर्यवेक्षक, दि. 11 रोजी सकाळी 7 वाजता लघुलेखक (निम्नश्रेणी), सकाळी 11 वाजता लघुलेखक (उच्चश्रेणी) व दुपारी 3 वाजता कनिष्ठ सहायक (लेखा) पदासाठी परीक्षा होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात पाच केंद्रे निश्चित करण्यात आली असून, 15 पदांच्या परीक्षेसाठी 2 हजार 541 इतकी उमेदवारांची संख्या आहे. दि. 7 व 8 रोजी होणार्‍या परीक्षेचे प्रवेश पत्र जिल्हा परिषद कोल्हापूरच्या https://www. zpkolhapur.gov.in/   या संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई व अरुण जाधव उपस्थित होते. यासंदर्भात काही अडचण असल्यास जि.प. सामान्य प्रशासन विभागातील मदत कक्षाशी संपर्क साधावा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news