

Youth Death Kolhapur
कोल्हापूर : कामोत्तेजक गोळ्यांचे जादाप्रमाणात सेवन झाल्याने बेशुध्द झालेल्या तरुणाचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचा प्रकार घडला. उत्तरीय तपासणीनंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याने नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे शुक्रवारी रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नव्हते.
काही दिवसांपूर्वी नोकरीला लागलेला तरुण मौजमजा करण्यासाठी मित्रांसमवेत स्टेशन रोडवर आला होता. दोघांनीही मद्यप्राशन केल्यानंतर एका टपरीवर खाद्यपदार्थ घेतले. मध्यरात्री उशिरा २५ वर्षीय तरुण स्टेशन रोडवरील एका लॉजवर गेला. तर मित्र रस्त्यावरच थांबून त्याची वाट पाहत होता.
काही काळानंतर मित्राच्या चौकशीसाठी तो खोलीमध्ये गेला असता, संबंधित मित्र बेशुध्द अवस्थेत आणि विवस्त्र स्थितीत पडला होता. त्यास मध्यरात्री तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
तरुणाने कामोत्तेजक गोळ्यांचे जादा सेवन केल्यामुळे हा प्रकार घडला असावा, अशी रुग्णालयात चर्चा होती. शवविच्छेदनाचा स्पष्ट अहवाल हाती आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले.