कोल्हापूर ः ताराबाई पार्क पाण्याच्या टाकीजवळचा व्हॉल्व्हची झापडी पडल्याने या टाकीवर अवलंबून असणार्या भागामध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा झाला नाही. सकाळपासून व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम सुरू होते. सायंकाळी पाचनंतर हे काम पूर्ण झाले. त्यामुळे आजपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
ताराबाई पार्क येथील पाण्याच्या टाकीजवळचा कंट्रोल व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाला. झापडी आत पडल्यामुळे या पाण्याच्या टाकीवर अवलंबून असणार्या कदमवाडी, भोसलेवाडी, कारंडे मळा, ताराबाई पार्क, कनाननगर, नागाळा पार्क आदी भागांतील पाणीपुरठा शुक्रवारी झाला नाही. महापालिकेने दाट लोकवस्तीमध्ये जेथे अजिबातच पाण्याचा पुरवठा झाला नाही तेथे टँकरद्वारे पाणी पुरविण्याचा प्रयत्न केला. व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम दिवसभर सुरू राहिले. सायंकाळी व्हॉल्व्ह दुरुस्त झाल्यानंतर तो बसविण्यात आला. त्यामुळे आजपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.