विशाळगडावरील उरुसाला परवानगी नाकारली

Kolhapur News | Vishalgad Urus | जिल्हा प्रशासनाची मनाई
Vishalgad Fort
विशाळगडावरील कारवाईला हायकोर्टाची स्थगितीPudhari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विशाळगड (ता. शाहूवाडी) येथे रविवारी (दि.१२) होणाऱ्या उरुस उत्सवाला (Vishalgad Urus) जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने परवानगी नाकारली आहे. नुकतीच विशाळगडावर पर्यटक आणि भाविकांना जाण्यासाठी अटी व शर्थी लावून परवानगी दिली आहे. परंतु, गडावरील अतिक्रमणाविरोधातील कारवाई पूर्ण होत नाही. तोपर्यंत गडावर कोणतेही सण, उत्सव साजरे करण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. (Kolhapur News)

विशाळगड अतिक्रमण मुक्त करून त्याचे ऐतिहासिक सौंदर्य व महत्त्व अबाधित राहावे आणि त्याचे जतन-संवर्धन-संरक्षण राष्ट्रीय संपत्ती म्हणून व्हावी, या उद्देशाने विशाळगड मुक्ती आंदोलन छत्रपती संभाजीराजे तसेच विविध संघटनेच्या वतीने दि. १४ जुलै २०२४ रोजी पुकारले होते. विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनास हिंसक वळण लागून गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या तसेच विशाळगड अतिक्रमणाचा काहीही संबंध नाही, अशा गजापुरातील मुसलमान वाडीतील घरांची, वाहनांची, दुकानांची, प्रापंचिक साहित्यांची तोडफोड आंदोलनकर्त्यांनी केली होती. परिणामी परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती.

त्यानंतर तब्बल सहा महिन्यानंतर विशाळगड पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. प्रशासनाने यास तात्पुरती परवानगी दिली असली तरी पर्यटकांना नियम व अटी पाळाव्या लागणार आहेत. पर्यटकांनी नियमांचे व अटींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामलिंग चव्हाण यांनी केले आहे. प्रशासनाने परवानगी दिल्याने गडवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र पर्यटकांना ३१ जानेवारीपर्यंतच सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत विशाळगडावर जाता येणार आहे.

Vishalgad Fort
'विशाळगड' अखेर नियम,अटींसह पर्यटकांसाठी खुला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news