Kolhapur Car Fire | उदगाव येथे चारचाकी पेटली: इंधनाच्या टाकीचा स्फोट; 7 जण सुखरूप

सावकार मादनाईक यांच्यासह नागरिकांचे बचाव कार्य
Kolhapur Car Fire | उदगाव येथे चारचाकी पेटली: इंधनाच्या टाकीचा स्फोट; 7 जण सुखरूप
Pudhari
Published on
Updated on

Car Fire Incident Udgaon Jaysingpur

जयसिंगपूर : उदगाव (ता.शिरोळ) येथील औद्योगिक वसाहतीच्या बाह्य वळणावर रविवारी (दि.२२) दुपारी नृसिंहवाडीहून सांगलीकडे जाणारी चारचाकीला अचानक आग लागली. अचानकपणे भले मोठे आगीचे लोट येत असताना रस्त्यावरून जाणारे भाजपचे नेते सावकार मादनाईक यांच्यासह नागरिकांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गाडीचे दरवाजे ओढून काढून ड्रायव्हरसहीत सात जणांची बचाव कार्य करून त्यांना सुखरूपपणे बाहेर काढल्याची घटना घडली.

दरम्यान, बचाव कार्य झाल्यानंतर लगेचच वाहनाच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट झाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याचे अग्निशमन दलाला पाचारण केले. या पथकाने ही आग विझविली. मात्र, अवघ्या 15 मिनिटांत गाडी जळून खाक झाली होती. घटनेनंतर मादनाईक यांनी स्वत:ची चारचाकी बोलावून या कुटुंबाला कोल्हापूर येथे घरी पाठविले.

Kolhapur Car Fire | उदगाव येथे चारचाकी पेटली: इंधनाच्या टाकीचा स्फोट; 7 जण सुखरूप
kolhapur | कोल्हापुरी सुगंधी व्यापार दीड शतकात 200 कोटींवर!

याबाबत अधिक माहिती अशी, पुणे येथील मोनाली पाटील या आपल्या दोन मुलांसह आई, बहीण, बहिणीचा मुलगा व वाहनचालक असे मिळून रविवारी दुपारी नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून ते कवठेपिरान येथील पाहुण्यांकडे दुपारी निघाले होते. उदगाव येथील ल.क.अकिवाटे औद्योगिक वसाहतीच्या बाह्य वळणावर आल्यावर या सात सीटर वाहनाच्या इंजिनमधून धूर आणि जाळ आला. यावेळी गाडीचे ब्रेक फेल झाले. याचवेळी शेताकडे जाणारे सावकार मादनाईक व नागरिकांना ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तातडीने ड्रायव्हर, तीन महिला व तीन मुलांना तातडीने बाहेर काढून बाजूला आणले.

इतक्यातच वाहनाच्या इंधनाच्या टाकीमध्ये भला मोठा स्फोट झाल्याने सर्वत्र आग लागली. नागरिकांनी शिरोळ येथील अग्निशमन दलाला पाचारण केले असता आग विझविली. मात्र अवघ्या 15 मिनिटांत हे वाहन जळून खाक झाले. आगीच्या घटनेमुळे भले मोठे धुराचे लोट येत होते. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news