Tulshi Dam | तुळशी प्रकल्प ७७ टक्के भरला: धरणातून विसर्ग सुरु

गेल्या चोवीस तासांत ७० मीमी पावसाची नोंद
 Tulshi project water level
तुळशी प्रकल्प ७७ टक्के भरला आहे.(Pudhari Photo)
Published on
Updated on

Kolhapur Rain Update

धामोड : धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी प्रकल्प ७७ टक्के भरला असून धरणाच्या तिन्ही वक्र दरवाजातून प्रतिसेकंद ५०० क्युसेक ने पाणि नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

तुळशी धरण परिसरात २३ मेपासून आज अखेर  २४०० मी मी इतका पाऊस झाला आहे. तर गेल्या चोवीस तासांत ७० मी मी इतका पाऊस झाला असल्याने धरण पहिल्यांदाच जुलैच्या पहिल्या आठवडयात ७७ टक्के भरले आहे. धरणाची पूर्ण संचय पातळी ६१६. ९१ मीटर असून धरणाची सद्याची पातळी ६१२.२७ इतकी आहे. या परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आला आहे.

तुळशीतून पाणी सोडल्यामुळे नदी काठच्या गावांना पुराचा धोका वाढला आहे. तुळशी नदीवरील बीड बंधारा पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

 Tulshi project water level
Kolhapur Court Bench: कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीला सरन्यायाधीश गवई यांचा पाठिंबा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news