कोल्हापूर : शाहूवाडीतील १८ गावांमध्ये सत्तांतर; सत्यजित पाटील यांची २६, तर विनय कोरे यांची १३ ग्रामपंचायतीमध्ये सत्ता

कोल्हापूर : शाहूवाडीतील १८ गावांमध्ये सत्तांतर; सत्यजित पाटील यांची २६, तर विनय कोरे यांची १३ ग्रामपंचायतीमध्ये सत्ता
Published on
Updated on

सरुड; पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यात तब्बल २६ ग्रामपंचायतींवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते माजी आमदार सत्यजित पाटील यांची सत्ता आली आहे. तर विद्यमान आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाला १३ ग्रामपंचायतींची सत्ता मिळाली. स्थानिक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ६ ग्रामपंचायतींवर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका ग्राम पंचायतीची सत्ता ताब्यात घेतली. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. शाहूवाडी येथे मंगळवारी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार गुरू बिराजदार, सहायक निवडणूक अधिकारी रवींद्र मोरे यांच्या देखरेख आणि मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली.

शाहूवाडी तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिल्याचे मंगळवारच्या मतमोजणीत स्पष्ट झाले. तालुक्याचे केंद्रस्थान समजल्या जाणाऱ्या बांबवडेत शिवसेना, जनसुराज्य, काँग्रेसच्या समर्थकांनी एकत्र येत माजी सरपंच विष्णू यादव यांच्या आघाडीला खिंडीत गाठण्याची केलेली व्यूहरचना यशस्वी झाली. येथे शिवसेनेचे उमेदवार भगतसिंग चौगुले सरपंचपदी विराजमान झाले आहेत. चरण येथे यशवंत पुरस्कार प्राप्त माजी सरपंच के. एन. लाड (शिवसेना) यांनी पुन्हा एकदा सत्ता हस्तगत केली आहे. येथे जनसुराज्य समर्थकांमधील दुफळीचा शिवसेनेला मोठा फायदा झाला आहे. साळशी येथे अनपेक्षित घडामोडीत आकाराला आलेल्या युवकांच्या पॅनेलने विजयी लक्ष गाठले. येथील निवडणुकीत आनंदा पाटील हा सर्वसमान्य युवक सरपंच म्हणून निवडला गेला आहे. आघाडीवरील नेत्यांना लोकांना गृहीत धरण्याची जडलेली सवय किती चूक होती हेच येथे या युवकांच्या आघाडीने दाखवून दिले. भेडसगांवमध्ये माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती हंबीरराव पाटील (शिवसेना) यांना जनसुराज्य शक्ती आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी कडवा प्रतिकार केला. सरपंचपदासह एकूण सहा जागा घेत सत्ता राखली असली तरी विरोधी आघाडीने सदस्यपदाच्या सहा जागा निवडून आणून बहुमत मिळविले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम साथ

दरम्यान आधीच शिवसेनेच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी बिनविरोध निवडीमध्ये ७ पैकी ४ ठिकाणी तर प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या ४० पैकी २२ आशा एकूण २६ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, जिल्हा बँक संचालक रणवीरसिंग गायकवाड यांची शिवसेनेला अपेक्षेप्रमाणे भक्कम साथ मिळाल्याचे निकालातून स्पष्टपणे दिसून येते. बजागेवाडीत शिवसेनेने काँग्रेस समर्थकांच्या साथीने सत्तांतर घडविले. तर कडवे येथे याच युतीने माजी जि. प. सदस्य सर्जेराव पाटील पेरिडकर यांचा सत्तेचा मनसुबा उधळून लावला.

दरम्यान शिवसेनेने कापशी, बांबवडे (आघाडी), बजागेवाडी (आघाडी), विरळे, खोतवाडी, तुरुकवाडी, खुटाळवाडी, येलूर, चरण, वरेवाडी, भाडळे (आघाडी) येथील जनसुराज्य शक्ती पक्षाकडून सत्ता काढून घेतली. तर जनसुराज्य पक्षाने करंजफेण, शिवारे, गोगवे, आरुळ, अमेणी, उचत येथे सत्ता काबीज करीत शिवसेनेला सत्तेवरून पायउतार केले. शिवसेनेने १३ ठिकाणची सत्ता कायम राखली त्याचवेळी जनसुराज्य पक्षाने ७ ग्राम पंचायतीचा गड शाबूत ठेवला. कोपार्डे, घुंगुर, येळवण जुगाई, टेकोली येथे स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व याही निवडणुकीत अबाधित राहिले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news