Kolhapur - Goa Flight | अवघ्या २० ते ३० मिनिटांत गाठता येणार कोल्हापूर ते गोवा अंतर

ऑक्टोबर महिनाअरवेर आणखी तीन सेवा शक्य
Kolhapur - Goa Flight
Kolhapur - Goa Flight
Published on
Updated on

कोल्हापूरः पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर-गोवा मार्गावर लवकरच विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्ष या सेवेला प्रारंभ होईल, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर-गोवा आणि कोल्हापूर- दिल्ली या नव्या मार्गावरील सेवेसह कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावर आणखी एक सेवा सुरू होणार आहे.

(Kolhapur - Goa Flight)

Kolhapur - Goa Flight
Nashik Rain Update | गोदावरीला हंगामात दुसऱ्यांदा पूर, मंदिरे पाण्याखाली

कोल्हापूर-गोवा या मार्गावर विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी होती, ती पूर्णत्वाला येण्याची दाट शक्यता आहे. गोवा-कोल्हापूर आणि कोल्हापूर-हैदराबाद, हैदराबाद कोल्हापूर आणि कोल्हापूर-गोवा अशी ही दैनंदिन सेवा सुरू होईल, यादृष्टीने नियोजन केले जात आहे. यानिमित्ताने आणखी एक विमान कंपनी कोल्हापूरशी जोडली जाणार आहे.

या कंपनीनेही सकारात्मक दर्शवल्याचे सांगण्यात येत आहे. कोल्हापूर-गोवा मार्गावरील विमानसेवेबाबत सध्या सुरू असलेल्या सर्व बाबी वेळेत पूर्ण झाल्या तर २५ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू होईल, अशी शक्यता आहे. यामुळे कोल्हापूर ते गोवा हे अंतर अवघ्या २० ते ३० मिनिटांत गाठता येणार आहे. याबरोबर सध्या कोल्हापूर-हैदराबाद मार्गावर एक विमानसेवा सुरू आहे. त्यात आणखी एका विमानसेवेची भर पडणार असून दररोज हैदराबादसाठी दोन फ्लाईट प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.

कोल्हापूर-दिल्लीसाठी पुढील महिन्यात 'एअरबस'ची चाचणी शक्य

कोल्हापूर-दिल्ली मार्गावर दि. २५ ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरू करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. याकरीता कंपनीकडून 'एअरबस' विमान वापरले जाणार आहे. याबाबतच्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया गतीने सुरू असून याबाबतचे अंतिम प्रक्रियांसाठी पुढील आठवड्यात विमानतळ प्राधिकरणाकडे प्रस्ताव जाणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यात 'एअरबस' या विमानाची कोल्हापूर विमानतळावर चाचणी होईल, अशी शक्यता आहे.

कोल्हापूर-अहमदाबादही सुरू होण्याची शक्यता

यापूर्वी कोल्हापूर-अहमदाबाद या मार्गावर असलेली विमानसेवा बंद होती, ती ही ऑक्टोबरपासून सुरू होण्यासाठी संबधित कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत.

त्याचबरोबर आणखी एका कंपनीने कोल्हापूर-अहमदाबाद या मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे या मार्गावरही लवकरच विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

Kolhapur - Goa Flight
महिलांना घरात बसून ई-एफआयआर दाखल करता येणार : पंतप्रधान

पुढील वर्षापासून मुंबईसाठीही फेऱ्या वाढणार

सध्या मुंबईसाठी स्लॉट मिळणे आणि उडाण योजनेमुळे फ्लाईटची संख्या वाढत नसल्याचे चित्र आहे. मात्र, नवी मुंबई विमानतळ पुढील वर्षी खुले होणार आहे. त्यामध्ये कोल्हापूरला मोठी संधी आहे, त्यानूसार आतापासूनच नियोजन सुरू आहे.

सध्याच्या उडाण योजनेचाही या मार्गावरील कालावधी संपत असल्याने नवी मुंबईचे विमानतळ सुरू झाल्यानंतर कोल्हापूर-मुंबई मार्गावर सकाळी आणि रात्रीच्यावेळी फ्लाईटची संख्या वाढणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news