कोल्हापूर: खाेतवाडीत सात लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : खोतवाडी (ता. हातकणगले) येथील आसीफ कमरूल्ला शेख यांच्या बंद घराचे कुलुप तोडून १२ तोळे सोने व रोख एक लाख रूपयांची रोकड असा सात लाखांचा ऐवज चोरटयानी लंपास केला. त्यामुळे खोतवाडीमध्ये खळबळ उडाली आहे.
ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. वाढत्या उष्म्यामुळे घरातील शेख कुटुंबीय रात्री करा वाजता घराला कुलुप लावून वरच्या मजल्यावरील रूममध्ये झोपण्यासाठी गेले . याचा फायदा घेत चोरट्यांनी डल्ला मारला.
शेख कुटुंबीय भरवस्तीत राहत असून, चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी शेजारी असणाऱ्या घरांना कडी घालून परिसरात असणाऱ्या फिरत्या कुत्र्याना बिस्कीटे दिल्याने अनेक कुत्री बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. यावेळी शहापूर पोलीसांनी श्वानपथकाला पाचारण करुन घटनास्थळावर पंचनामा केला. ठसे तज्ज्ञांनी अनेक ठिकाणचे ठसे घेण्याचे काम सुरू होते.
हेही वाचलं का?

