कोल्हापूर : प्रेमी युगुलाने एकाच दोरीने गळफास घेवून जीवन संपवले

file photo
file photo
Published on
Updated on

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : प्रेमी युगुलाने एकत्रीत जीवन संपवल्याने कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. दोघांच्या घरातून प्रेमास विरोध होत असल्याने प्रेमी युगुलाने नायलॉन दोरीने गळफास घेवून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत दोघेही अल्पवयीन होते. पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

प्राथमिक माहितीनुसार मृत १८ वर्षीय मुलगा व १७ वर्षीय मुलगी एकाच गल्लीत राहत होते. या दोघांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबध होते. पण त्यास दोन्हीही कुटुंबीयांकडून विरोध होता. दोघांना परस्पर कुटुंबीयांनी समज दिली होती. त्यामुळे आपल्या प्रेमास विरोध असून आपला विवाह होणार नाही, या भावनेतून शुक्रवारी रात्री मुलगी बाहेर पडली होती. तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नाही. ती रात्री प्रियकर मुलाच्या घरी गेली आणि तिथेच दोघांनी घरातील लोंखडी पाईपला नायलॉनच्या दोरीने जीवन संपवले. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या प्रकाराने शिरोली परिसरात खळबळ माजली आहे. रेणुका नगर येथील या घटनास्थळावर नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी तरुणांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदन करण्यासाठी कोल्हापूर येथे पाठवून दिले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news