Athani sugar : बांबवडे येथे स्वाभिमानीने ‘अथणी’ची साखर, स्पिरिट वाहतूक रोखली

Athani sugar : बांबवडे येथे स्वाभिमानीने ‘अथणी’ची साखर, स्पिरिट वाहतूक रोखली
Published on
Updated on

सरूड : पुढारी वृत्तसेवा : सोनवडे-बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील अथणी शुगर प्रायव्हेट लि. (युनिट २) कारखान्याकडे साखरेची वाहतूक करण्यासाठी कर्नाटकातून आलेले काही ट्रक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखली. त्यानंतर संबंधित वाहतूकदारांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाची भूमिका समजावून माघारी पाठविले. (Athani sugar)

संबंधित बातम्या 

  • भोगावती साखर कारखाना वार्षिक सभा : अडचण असतानाही एफआरपीनुसार ऊसदर दिला; पी.एन.पाटील
  • 'माळेगाव'चा ऊसदर 'सोमेश्वर'पेक्षा रुपये जास्त
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या गळीत हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. ४) दुपारी संघटनेचे शाहूवाडी तालुका अध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, जयसिंग पाटील, भैय्या थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कारखाना साईटवरील रस्त्यावर सदरची वाहतूक रोखण्यात आली. यावेळी साखरेसह स्पिरिट वाहतुकीची वाहने नुकसानीच्या भीतीने जागेवरच थांबवून ट्रक चालकांनी वाहनांच्या आसऱ्याला उपलब्ध शिधा शिजवून पोटपूजा केली. (Athani sugar)

दरम्यान, अथणी शुगर प्रशासनाने स्वाभिमानीचे माजी खा. राजू शेट्टी यांना एक पत्र लिहून त्यामध्ये गत गळीत हंगामातील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत दरवर्षी प्रमाणे सवलतीच्या दरातील टनेज वरील सुमारे ३ हजार ७९६ क्विंटल साखरेचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या आंदोलनाचा अडथळा होऊ नये. तसेच शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्याची विनंती केली आहे.

मात्र, संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कारखाना प्रशासनाची विनंती धुडकावून लावत साखर, स्पिरिट यासह अन्य उपपदार्थ वाहतुकीची वाहने कोणत्याही परिस्थितीत कारखान्यातून बाहेर पडू दिली जाणार नसल्याचे ठणकावले. यावेळी शाहूवाडी पोलिसांच्या संरक्षणामध्ये सदरची साखर वाहतूक करण्याच्या अथणी प्रशासनाच्या हालचाली दिसताच तालुक्यातील स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते बांबवडे येथे एकत्र जमा झाले होते. यामुळे काही स्थानिक साखर खरेदीदार तसेच परप्रांतीय वाहतुकदारांची वाहने खोळंबून राहिल्याचे दिसून आले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news