MPSC Result | कष्ट, जिद्दीच्या बळावर पीएसआय पदाला गवसणी; नरंदे येथील अभिनंदनचे प्रेरणादायी यश

Abhinandan Wadkar PSI | दुसऱ्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पद मिळविले
Abhinandan Wadkar PSI
अभिनंदन वाडकर Pudhari
Published on
Updated on

Kolhapur MPSC Result

कुंभोज : जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील अभिनंदन वाडकर याने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे. निवडीनंतर मित्र सवंगड्यांनी आतषबाजी करून जल्लोष व्यक्त केला.

नरंदे येथील अभिनंदन याने दुसऱ्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पद मिळविले. वडिलांनी इंडियन आर्मी मध्ये सेवा केली आहे. त्यांची प्रेरणा घेऊन कष्ट आणि जिद्दीच्या बळावर यशाला आपल्या कवेत घेतले. वडील सध्या निवृत्त झाले असुन आदर्श विद्यानिकेतन मिणचे येथे कार्यरत आहेत.

Abhinandan Wadkar PSI
MPSC Results | आईचे छत्र हरपले, वडील अंथरुणाला खिळले; जिद्दीने आकाश केडगेने गाठले पीएसआय पद

अभिनंदनने प्राथमिक शिक्षण बाहुबली विद्यामंदिर, तर माध्यमिक शिक्षण आदर्श विद्यानिकेतन येथे झाले. तसेच पेठ वडगाव येथील विजयसिंह यादव महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पदवीपर्यंत झाले. या यशात आई तसेच वडील व मित्र परिवार सर्व नातेवाईकांचे मोठे पाठबळ असल्याचे अभिनंदन वाडकर यांने सांगितले.

परीक्षा देत असताना दोन-तीन परीक्षेत यश मिळाले. परंतु लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊनच यशस्वी व्हायचे. अशी जिद्द मनाशी केली होती. प्रयत्नाने पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले. भविष्यात अभ्यास करून पुढील पद मिळवण्याची मनीषा व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news