

शिरोली एमआयडीसी: पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान अंतर्गत शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर (स्मॅक) च्या वतीने पोषण आहारचे दोनशे कीट सीपीआर रुग्णालयाकडे प्रदान करण्यात आले. क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी सहाय्य करून 'निक्षय मित्र' होऊन टी.बी. मुक्त भारत करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल ऐडगे यांनी केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत स्मॅकने समाजासमोर आदर्श घालून दिला आहे, असे मत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. बी. थोरात यांनी व्यक्त केले.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांच्या प्रमुख उपस्थितीत पोषण आहार कीट वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील यांनी स्मॅक च्या माध्यमातून क्षयरुग्णांना व क्षयरोग विभागास आवश्यक मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली.
क्षयरोग ही एक जागतिक आरोग्य समस्या आहे. याचे गांभीर्य ओळखून आम्ही पोषण आहार कीट वाटप करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्मॅक सुवर्णमहोत्सव समिती अध्यक्ष सुरेन्द्र जैन यांनी सांगितले.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी माहिती देताना पोषण आहार कीट रुग्णांना आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच उद्योगांनी कामाच्या ठिकाणी वर्कप्लेस पॉलिसी राबविण्याबाबत सुचना त्यांनी केली. क्षयरोग तपासणी शिबिर, क्षयरोग जनजागृती, कार्यशाळा इत्यादी. उपक्रम कसे राबबावेत, याबाबत माहिती दिली. तसेच पोषण आहार कीट पुरविल्याबद्दल सर्व उद्योजकांचे आभार मानले.
यावेळी स्मॅकचे सदस्य उद्योजक सचिन मेनन, सुरेन्द्र जैन , नीरज झंवर, सुरेश चौगुले, बदाम पाटील, राजू पाटील, जयदीप चौगले, दादासाहेब दुधाळ, कोंडेकर , जीएसटी सल्लागार विनायक गायकवाड यांनी निक्षय मित्र बनत क्षयरुग्ण दत्त्तक घेतले.
यावेळी स्मॅक अध्यक्ष राजू पाटील, उपाध्यक्ष भरत जाधव, खजानिस बदाम पाटील, सुवर्णमहोत्सव समिती अध्यक्ष सुरेन्द्र जैन, स्मॅक क्लस्टर अध्यक्ष सुरेश चौगुले, संचालक जयदीप चौगले, सचिन मेनन, अजिंक्य तळेकर आदी उपस्थित होते.