Silver Rate fell : चांदी दर घसरणीमुळे व्यावसायिक सुखावले

खरेदी-विक्रीचे व्यवहारही सुरळीत होण्याच्या आशा पल्लवित
Silver Rate fell
चांदी दर घसरणीमुळे व्यावसायिक सुखावलेPudhari News Network
Published on
Updated on

तानाजी घोरपडे

हुपरी : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे चांदीचे दर गगनाला भिडले होते. त्याचा मोठ्या प्रमाणात मनस्ताप हुपरी परिसरातील चांदी व्यावसायिकांना सहन करावा लागला. परंतु, गेल्या चार दिवसांच्या कालावधीत तब्बल 1 लाख रुपयांनी चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहून चांदी व्यावसायिक सुखावल्याचे पाहावयास मिळत आहे. काही दिवसांपूर्वी चांदीचे गगनाला भिडलेले दर पूर्ववत होण्याच्या व व्यवहारही पूर्ववत सुरू होण्याच्या चांदी व्यावसायिकांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत.

एक ते दीड महिन्याच्या कालावधीत एक लाख रुपयांच्या जवळपास खेळत असणाऱ्या चांदी दराने ‌‘न भूतो, न भविष्यती‌’ असा तब्बल 4 लाखांचा टप्पा ओलांडला होता. सातत्याने होत असलेल्या भरघोस दरवाढीने देशातील बाजारपेठेवरील दागिन्यांच्या मागणीत मोठ्याप्रमाणात घट झाली होती. परिणामी, चांदी खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. यापुढील कालावधीत चांदी व्यवसायाचे भविष्य अंधःकारमय झाल्याने हुपरी व परिसरातील चांदी व्यावसायिक अनेक प्रकारच्या विवंचनेत सापडला होता. सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असणाऱ्या येथील चांदी व्यवसायाचे कंबरडे मोडणारी ही दरवाढ ठरली होती. संपूर्ण चांदी व्यवसायाच्या जणू मुळावरच दरवाढ उठल्याने सर्वच व्यावसायिकांनी आपले व्यवहार काही काळासाठी बंद ठेवणे पसंद केले आहेत.

तसेच, कुशल कारागिरांनीही आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचा रस्ता धरल्याचे पाहावयास मिळत आहे. चांदीच्या दरात भरमसाट वाढ झाल्याने चांदीची विक्री करून नफा मिळविण्यासाठी अनेकजणांनी प्रयत्न केले; पण एवढ्या दरात खरेदी करणारे कोणीही पुढे येत नसल्याने नफा मिळविण्याचे व्यावसायिकांचे स्वप्न हे एखादे मृगजळ ठरले गेले. हुपरीसह परिसरातील आठ-दहा गावांचा चांदी दागिने बनविणे हाच प्रमुख व्यवसाय असून, सध्या या व्यवसायात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्याप्रमाणात मंदी आल्याने परिसरातील सर्व प्रकारचे अर्थचक्र पूर्णपणे थांबले गेले आहे. सध्याच्या परिस्थितीत सराफांनी दागिन्यांची खरेदीच थांबविल्याने येथील चांदी व्यवसायात मोठ्या प्रमाणात मंदीचे वातावरण राहिले आह. परिणामी, चांदी उद्योगासह इतर सर्वच पूरक व्यावसायिकांनाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news