Kolhapur Accident | शिरोली एमआयडीसी येथे ३ वाहनांचा भीषण अपघात : १ ठार, २ गंभीर जखमी; कारमधील तिघेजण बालंबाल बचावली

ओव्हरटेक करताना खासगी बसची कंटेनरला तर कारची बसला धडक
Shiroli MIDC Road Crash
ओव्हरटेक करताना खासगी बसची कंटेनरला तर कारची बसला धडक झाली. (Pudhari Photo)
Published on
Updated on

Shiroli MIDC Road Crash Bus Car Container Collision

शिरोली एमआयडीसी: पुणे - बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरोली औद्योगिक वसाहतीतील मेनन पिस्टन्स कंपनीसमोर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात खासगी बसने थांबलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. त्यानंतर बसला पाठीमागून कारची धडक बसली. यात बसमधील एक जण जागीच ठार झाला. तर दोघेजण गंभीर तर १३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर कारमधील तिघेजण बचावले. जखमींना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात व काही जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हा विचित्र अपघात आज (दि.२४) सकाळी ७ च्या सुमारास घडला.

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार स्लीपर कोच खासगी बस (एम एच ०९ जी जे ६७५९ ) पुणे - निगडी ते बेळगावकडे ३६ प्रवासी घेवून निघाली होती. चालक संदीप शंकरराव चांगभले (वय ५४, रा. हरीनगर निपाणी) हा बस चालवत होता. ही बस शिरोली औद्योगिक वसाहत येथील मेनन पिस्टन्स कंपनीसमोर अन्य एका वाहणास ओव्हरटेक करत असताना रस्त्याच्या बाजूस चाकातील हवा कमी झाल्याने थांबलेल्या मालवाहू कंटेनरला (एम एच ४६ ए आर ५१८२) पाठीमागून जोराची धडकली. यात बसचा क्लिनर सौरभ ऊर्फ रोहन अजित कुलकर्णी (वय ३०, रा खडकलाट, चिकोडी ) हा जागीच ठार झाला. धडक झाल्याने बस जागीच थांबल्याने मागून येणारी कार (एम एच ५० यु ३७६५,) बसला मागून धडकली.

Shiroli MIDC Road Crash
‘राधानगरी’त 40 टक्के जलसाठा; कोल्हापूर, सांगलीवर महापुराची टांगती तलवार!

अपघातातील खासगी बसमधील जखमींची नावे

१. प्रवीण भैरू पुमनाचे (वय 33, निपाणी)

2. संदीप शंकरराव चलमले (वय 53)

3. नारायण वाट्लेकर (वय 23)

4. महेश पाटील (वय 30)

5. ऐश्वर्या गुडकर (वय 26)

6. सोनाली मोरे (वय ०२)

7. देवराज मोरे (वय 28)

8. स्वदेश देसाई (वय 25)

कार चालक राजेश भिमराव सुतार (वय 46, रा. संभूर, ता. पाटण, जि. सातारा) हे सरनोबतवाडी येथील कॅन्सर हॉस्पिटला किसन जाधव या पेशंटला घेवून जात होते. ही धडक होताच कारमधील दोन एअर बॅग ओपन झाल्याने कार चालक व बाजूस बसलेला पेशंटचा मुलगा महेश जाधव व पेशंट हे तिघे अपघातातून सुखरूप बचावले.

अपघातावेळी कारचे स्पिड ६५ किमी होते. यावरून धडकलेल्या ट्रॅव्हल्सचे स्पिड हे ७० ते ७५ किमीचे असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. हा अपघात इतका भीषण होता की महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ रूग्णवाहिकेतून रूग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.

Shiroli MIDC Road Crash
योगेश गुप्ता कोल्हापूर जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news