Kolhapur Accident | शिरोली औद्योगिक वसाहतीत ब्रेक निकामी झाल्याने टँकर पलटी; ३ टन तेल गळाल्याने लाखोंचे नुकसान

घटनास्थळी महावितरणचा मोठा ट्रान्सफॉर्मर, मोठा अनर्थ टळला
Shiroli Tanker Brake Failure
अपघातग्रस्त ऑइल टँकर Pudhari
Published on
Updated on

Shiroli Tanker Brake Failure

शिरोली एमआयडीसी : शिरोली औद्योगिक वसाहतीतील पोलीस ठाण्याशेजारी मंगळवारी सायंकाळी एका ऑइल टँकरचा अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्याने हा टँकर नियंत्रण सुटून पलटी झाला. टँकरमधील जवळपास तीन टन तेल गळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र, अपघाताच्या ठिकाणी महावितरणचा मोठा ट्रान्सफॉर्मर असूनही सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास ऑइल उतरण्यासाठी टँकर संबंधित कंपनीत येत होता. प्रवेशद्वाराजवळील चढ चढताना चालकाने गियर बदलण्यासाठी ब्रेक लावला; पण ब्रेक निकामी झाल्याने टँकर मागे सरकला. तो रस्त्याच्या कडेला असलेल्या चरीत जाऊन पलटी झाला.

Shiroli Tanker Brake Failure
Kolhapur Youth Death | आठ दिवसांपासून पोटदुखी; नागाव येथील १८ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

या घटनेच्या ठिकाणापासून अवघ्या काही फुटांवर महावितरणचा ट्रान्सफॉर्मर व बीएसएनएलच्या केबल्स होत्या. टँकर त्या खांबावर आदळला असता, भीषण अपघात घडला असता. सुदैवाने ते टळले. या घटनेत टँकर चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news